भारतीय संस्कृतीत गाय ही पूजनीय मानली जाते, तिच्या वासरांसोबत माणूसही आईसारखा नातं जोडतो. परंतु, काही लोकांच्या निष्काळजीपणामुळे प्राण्यांना गंभीर धोका पोहोचतो. सध्या सोशल मीडियावर एक थरकाप उडवणारा व्हिडीओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. या व्हिडिओत एका कार चालकाने गायीच्या बछड्याला धडक दिल्याचे आणि नंतर त्याला तब्बल २०० मीटरपर्यंत ओढत नेल्याचे दिसत आहे.
व्हिडिओ पाहून लोकांच्या भावनांना धक्का बसला आहे. घटनेतील कार चालकाने बछड्याला धडक दिल्यानंतर गाडी न थांबवता पुढे नेण्याचा प्रकार केला. बछड्याला झालेल्या या वेदनादायक प्रसंगामुळे अनेकांनी सोशल मीडियावर संताप व्यक्त केला आहे. हा व्हिडिओ पाहून जनावरांविषयी असलेल्या निष्काळजी वृत्तीबाबत चर्चेला उधाण आले आहे.
छत्तीसगडमध्ये भरदिवसा एका कार चालकाने रस्त्यावर चालणाऱ्या गाईच्या वासराला धडक दिली. इतक्यावरच न थांबता, वासराला सुमारे २०० मीटरपर्यंत ओढत नेले. हा हृदयद्रावक प्रकार पाहून गाईने कळपासह कारचा पाठलाग केला आणि कारसमोर उभी राहिली. सुरुवातीला आजूबाजूचे लोक गोंधळले असले, तरी काही वेळात कारखाली वासरु अडकल्याचे लक्षात आले. स्थानिकांच्या मदतीने वासराला बाहेर काढण्यात आले.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.