Food Viral Video Saam Digital
व्हायरल न्यूज

Viral Video: चकली सॅंडविच तुम्ही कधी खाल्लंय का? फराळ संपवण्यासाठी युनिक रेसीपी;VIDEOएकदा पहाच

Food Viral Video: सध्याच दिवाळी सण होऊन काही दिवस झाले आहेत. दिवाळीच्या सुरूवातीस फराळाचे अनेक पदार्थ बनवण्यात प्रत्येक गृहीणीची तारेवरची कसरत होत असे.अशातच सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. ज्यामध्ये दिवाळीत बनवल्या जाणाऱ्या चकलीपासून चक्क सॅंडविच तयार केले जात आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

Chakri sandwich Making Viral Video

दिवाळी सण होऊन काही दिवस झाले आहेत. दिवाळीच्या सुरुवातीला फराळाचे अनेक पदार्थ बनवण्यात प्रत्येक गृहिणीची तारेवरची कसरत होत असते. दिवाळी झाल्यानंतर केलेला फराळ संपता संपत नाही. अशातच सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. ज्यामध्ये दिवाळीत बनवल्या जाणाऱ्या चकलीपासून चक्क सॅन्डविच तयार केले जात आहे. यामुळे केलेला फराळ नक्कीच संपवला जाईल. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

व्हायरल होत असलेला व्हिडिओ इन्स्टाग्रामवरील @ohyumness या पेजवर पोस्ट करण्यात आला आहे. या पेजवर फूड संबंधित अनेक व्हिडिओ पोस्ट करण्यात आले आहे. फूड पेज हे अहमदाबादमध्ये राहत असलेल्या दिया शाह या तरुणीचे आहे. व्हिडिओ पोस्ट करत कॅप्शनमध्ये लिहिलय की चैन्नई प्रसिद्ध मुरुक्कू सँडविच.

स्वादिष्ट असे चकली सॅन्डविच....

व्हायरल होत असलेल्या व्हिडिओच्या सुरुवातीला, एका पांढऱ्या प्लेटमध्ये एकाबाजूला एक चकली ठेवण्यात येते. चकली ठेवल्यानंतर त्यावर पुदीनापासून तयार केलेली चटणी लावली जाते. मग काकडी, टोमॅटोचे केलेले काप ठेऊन त्यावर चवीसाठी मीठ अन् चीज स्लाईज ठेवले जाते. शेवटला परत एकदा पुदीना लावलेली चकली ठेवून तसंच वरून बटर , शेव टाकली जाते. मग तयार होते ते स्वादिष्ट चकली सॅन्डविच.

या व्हायरल व्हिडिओवर नेटकऱ्यांच्या विविध प्रतिक्रिया येत आहेत. या व्हिडिओला हजारोंच्या घरात नेटकऱ्यांची पंसती मिळाली आहे. एका यूजरने लिहिलं आहे की,'अरे देवा तू या सगळ्या गोष्टी कशा खाऊ शकतोस' तर आणखी एका यूजरने लिहिलंय की'मुरुक्कूला महाराष्ट्रात चकली म्हणतात' अशा प्रकारच्या प्रतिक्रिया चकली सॅन्डविचवर आल्या आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Andheri News : मुंबईत रेल्वे स्टेशन परिसरात पार्किंग माफियांची मुजोरी; रेल्वेच्या नियमांना हरताळ, नागरिकांची सर्रास लूट

कोचिंग क्लासची पिकनिक जीवघेणी ठरली, रायगडमध्ये समुद्रात अकोल्यातील शिक्षकासह विद्यार्थ्याचा बुडून मृत्यू

2026 मध्ये सोनं आणखी महागणार? महायुद्धानंतर शक्तिशाली नेता उदयास येणार?

Maharashtra Politics: शिवसेना भाजप संबंध तुटणार? ठाकरे- शिंदेंच्या युतीवर राणे आक्रमक

Sunday Horoscope : नातेवाईकांकडून लाभ मिळणार; 5 राशींच्या लोकांचे नशीब उजळणार, अफाट पैसा येणार

SCROLL FOR NEXT