Manasvi Choudhary
आज देव दिवाळी हा सण मोठ्या उत्साहात साजरा होत आहे.
त्रिपुरी पौर्णिमेच्या दिवशी भगवान शंकरांनी त्रिपुरासूर राक्षसाचा वध केला होता.
यावेळी भगवान शंकरांचा हा विजयोत्सव साजरा करण्यासाठी गंगा नदीच्या किनारी दिवे लावून प्रकाशाचा उत्सव साजरा करण्यात आला
यामुळे देव दिवाळीच्या दिवशी दीपदान करणे शुभ मानले जाते.
कार्तिक पौर्णिमेला म्हणजेच देव दिवाळीच्या दिवशी ब्रम्ह मुहूर्तावर स्नान करून उगवत्या सूर्याला नमस्कार केले जाते.
देव दिवाळीला प्रदोष काळात पिठाचे ११,२१,५१ आणि १०८ दिवे लावले जातात.
घराच्या अंगणात, तुळशीला तसेच देवघराजवळ दिप प्रज्वलन केले जाते.