Manasvi Choudhary
मराठी सा रे ग म प लिटील चॅम्प्सचा महाअंतिम सोहळा नुकताच पार पडला आहे.
सारेगमप लिटील चॅम्प्सच्या सिझनची गौरी अलका पगारे ही विजेती ठरली आहे.
गौरीने तिच्या गोड आवाजाने प्रेक्षकांना मंत्रमुग्ध केले आहे.
श्रावणी वागळे, ऋषीकेश ढवळीकर, जयेश खरे, देवांश भाटे, गीत बागडे आणि गौरी पगारे हे सहा स्पर्धक लिटील चॅम्प्स टॉप ६ मध्ये होते.
या स्पर्धेत विजेती ठरलेली गौरी मूळची कोपरगावच्या शेतकरी कुटुंबातील आहे.
अत्यंत खडतर परिस्थितीतून गौरीनं हे विजेतेपद मिळवलं आहे.
गौरी लहान असताना वडील तिला सोडून गेले. आई अलका पगारेने गौरींचा सांभाळ केला आहे.
लहान वयातच गौरी पगारेने गायिका होण्याचं स्वप्न पाहिलं होतं.
गौरी विजेती ठरल्यानंतर कार्यक्रमादरम्यान गौरीच्या आईने गौरीचे नाव बदलण्याचा निर्णय घेतला
गौरी आता गौरी अलका पगारे म्हणून ओळखली जातेय