गेल्या काही महिन्यापासून अनेक शहरातील रस्त्यांवर मोकाट जनावरांचा सुळसुळाट मोठ्या प्रमाणात वाढलेला आहे. महाराष्ट्र असो वा अन्य विभाग असो आपल्याला दररोज जनावरांच्या हल्ल्यात अनेकांना जीव गमवावा लागतो. सोशल मीडियावर अनेक असे व्हिडिओ तुम्हाला पाहायला मिळतात. अशातच या संबंधित एक धक्कादायक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झालेला आहे. जिथे रस्त्यावर सुरु असलेल्या दोन मोकाट वळुंमध्ये झुंज करत होते, तेवढ्यात बाजूने दुचाकीवरून चाललेल्या पुरुष आणि महिलेला जोरदार धडक दिल्याने दुचाकीवरील दोघेही खाली पडून जखमी झाले आहेत. याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.
व्हायरल (Viral) होत असलेल्या व्हिडिओत तुम्हाला कोपरगाव शहरातीला एक परिसर दिसून येत आहे. अनेक नागरिकांची आणि अनेक वाहनांची ये-जा रस्त्यावरुन होत आहे. मात्र याच परिसरात तुम्हाला व्हायरल व्हिडिओ दोन भारदस्त मोकाट वळु दिसत आहेत मात्र या दोन वळुंमध्ये भररस्त्यात आणि नागरिकांच्या गर्दीत (crowd) वळुंची झुंज होताना दिसून येत आहे.
मात्र या वळुंची झुंज होत असताना एक बाईक (Bike) तेथून जात असते. परंतू बाईकवरुन महिला आणि पुरुष जात असताना त्यांच्या बाईका वळुंचा जोरदार धक्का लागतो आणि बाईकस्वार (Bikers)आणि महिला जोरात पडतात एवढेच नाही तर जमिनीवर महिला आणि पुरुष पडताच त्यांच्या अंगावरुन ते वळुं जातात. या झालेल्या अपघातात दोघजण गंभीर जखमी होतात.
सध्या व्हायरल होत असलेला व्हिडिओ अहमदनगर (Ahmednagar) जिल्ह्यातील 'कोपरगाव' या शहरातील आहे. गेल्या अनेक दिवसांपासून मोकाट वळुंचा वावर परिसरात होत असल्याने तेथील नागरिक (Citizens) भयभीत झाले होते आणि कोपरगाव नगरपरिषदेने शहरातील मोकाट जनावरांचा बंदोबस्त करावा अशी मागणी नागरिकांमधून होत आहे.
व्हायरल होत असलेला व्हिडिओ (Video) सोशल मीडिया प्लॅटफॉर्म इन्स्टाग्रामवर व्हायरल होत आहे. जर व्हिडिओ तुम्हाला पाहायचा असल्यास तो तुम्ही ''@saamtv'' यावर पाहू शकता. सोशल मीडियावर याआधी मोकाट कुत्र्यांच्या चिमुकल्यांवर आणि रस्त्यावरील अनेक नागरिकांवर हल्ला करण्याचे व्हिडिओ व्हायरल झालेले असून मोकाट वळुंच्या हल्ल्यातही अनेक नागरिक जखमी झालेले आहेत.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.