Kolhapur Viral Video: कोल्हापूर जिल्ह्यात बेंदूरचा सण पारंपरिक उत्साहात साजरा करण्यात आला. या सणामध्ये बैलांची मिरवणूक काढण्याची परंपरा अनेक गावांमध्ये वर्षानुवर्षे सुरू आहे. विशेषत पश्चिम महाराष्ट्रातील कोल्हापूर, सांगली, सातारा या जिल्ह्यांमध्ये बेंदूर मोठ्या थाटामाटात साजरा केला जातो.
कोल्हापूर (Kolhapur) जिल्ह्यातील निगवे खालसा या गावातही बेंदूरनिमित्त पारंपरिक वाद्यांच्या गजरात, ढोल-ताशांच्या निनादात बैलांची मिरवणूक काढण्यात आली होती. गावकरी मोठ्या संख्येने या मिरवणुकीत सहभागी झाले होते.
मात्र, सणाच्या या उत्साही वातावरणात एक अप्रिय घटना घडली. मिरवणुकीदरम्यान सजवलेल्या बैलांपैकी एका बैलाची दोरी अचानक तुटली. त्या बैलाने गर्दीतच धाव घेतली आणि परिसरात एकच धावाधाव उडाली. बैल आक्रमक होऊन थेट नागरिकांवर धाव घेत होता. काही क्षणातच संपूर्ण मिरवणुकीत गोंधळाची स्थिती निर्माण झाली होती.
बैल सैरावैरा पळू लागल्यानंतर उपस्थित ग्रामस्थ आणि पाहुणे प्रचंड घाबरले. आपल्या जीवाचा धोका ओळखून लोक इथून तिथून पळू लागले. बाजारपेठ, घराचे ओटे, गाड्यांच्या आड लपणाऱ्या नागरिकांचा जीव टांगणीला लागला होता. काहींनी तर थेट झाडांवर चढून आपला जीव वाचवण्याचा प्रयत्न केला.मात्र या घटनेत बैलाने तीन ते चार जणांना तुडवले असून काही तरुण जखमी झाले आहेत. सर्व व्हिडिओ(Video) आता समोर आलेला आहे.
टीप : हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. याची पडताळणी झालेली नाही. फक्त माहिती म्हणून आम्ही वाचक-प्रेक्षकांपर्यंत ही बाब पोहचवत आहोत. याचं आम्ही कोणत्याही प्रकारे समर्थन करत नाही.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.