Up Crime News: SAAM DIGITAL
व्हायरल न्यूज

Up Viral Video: बहिणीला वाचवण्यासाठी भावाची तळमळ; रुग्णवाहिका नसल्यानं दुचाकीवरून नेला मृतदेह, घटनेचा VIDEO व्हायरल

Up Viral Video: उत्तर प्रदेशातील औरेयामधून एक मन हेलावणारी घटना समोर आली आहे. औरेयामध्ये रुग्णालयात रुग्णवाहिका उपलब्ध

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

Up Viral Video

उत्तर प्रदेशातील औरेयामधून एक मन हेलावणारी घटना समोर आली आहे. औरेयामध्ये रुग्णालयात रुग्णवाहिका उपलब्ध नसल्यामुळे भावाला चक्क आपल्या बहिणीचा मृतदेह दुचाकीवरून घेऊन जावा लागला आहे. त्यामुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

व्हिडिओत औरेयामधील बिधुता कम्युनिटी हेल्थ सेंटर येथे बुधवारी सकाळी (दि.8) सदर घटना घडलीये. या रुग्णालयातील एक तरुण आपल्या बहिणीचा मृतदेह दुचाकीवर बसवताना दिसत आहे. या व्हिडिओत आपल्याला त्या भावाचं बहिणीवरील प्रेम दिसून येत आहे.

मृत महिलेच्या मृत्यूचे नेमके कारण काय...?

सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, बुधवारी सकाळी घरी पाणी गरम करण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या विद्युत रॉडचा शॉक लागला होता. यामुळे तिला जवळील रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र डॉक्टरांनी तीला मृत घोषित केले. मात्र तिच्या भावाला आपल्या बहिणीचा मृत्यू झाला आहे यावर विश्वासच बसत नव्हता. त्यामुळे त्याने तिला तातडीने दुसऱ्या रुग्णालयात नेण्याचा प्रयत्न केला. परंतु रुग्णालयात रुग्णवाहिका उपलब्ध नव्हती. यामुळे तरुणीच्या भावाला त्याच्याच दुचाकीवरून दुसऱ्या रुग्णालयात जावे लागले.

उत्तर प्रदेशातील काँग्रेसच्या एक्स @INCUttarPradeshया अकाउंटवरून हा व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे. तसंच या घटनेमुळे उत्तर प्रदेशमधील आरोग्यसेवेची झालेली दुरवस्था समोर आली आहे. दरम्यान या घटनेचा अधिक तपास पोलिसांकडून करण्यात यावा. तसेच यामधील दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी होत आहे

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: 22 देशातून 18 हजार किलोमीटरचा प्रवास 70 दिवसात करत पंढरीची वारी पोहोचली लंडनला

Kasara waterfall: मुंबईपासून अगदी हाकेच्या अंतरावर आहेत हे सुंदर धबधबे; One Day पिकनीक नक्की करा

Nagpur: गँगस्टरच्या पत्नीसोबत अफेअर, महिलेचा मृत्यू; इप्पा गँगच्या मनात वेगळाच संशय, 'टोपी'च्या शोधात ४० लोक

Maharashtra Population: महाराष्ट्राची लोकसंख्या किती आहे?

Raigad Politics : रायगडच्या वादाचा दुसरा अंक; राष्ट्रवादी भाजपमध्ये सुप्त संघर्ष

SCROLL FOR NEXT