Himalayan 452 Featues: लवकरच येणार हिमालयन 452 Electric Bike; खाच खळग्याच्या रस्त्यावरही धावेल हिमालयन बाईक, जाणून घ्या सर्व फिचर्स

Himalayan 452 : या बाईकला सध्या बाजारात असलेल्या हिमालयन ४११ पेक्षा वेगळं बनवण्यात आलंय.
Himalayan 452
Himalayan 452 Himalayan 452 - money control
Published On

Himalayan 452 Electric Bike:

सध्या इलेक्ट्रिक वाहनांचं जग आलंय. प्रदूषण कमी व्हावे, यासाठी सरकारसुद्धा इलेक्ट्रिक वाहन घेण्यासाठी लोकांना प्रोत्साहन देत आहे. इंधनाच्या ग्राहकांचा ओढासुद्धा या वाहनांकडे वाढू लागलाय. ग्राहकांची ओढ बघत रॉयल एनफील्ड कंपनीने EICMA 2023 या इव्हेंटमध्ये इलेक्ट्रिक बाईक लॉन्च केलीय. चेन्नईमध्ये स्थित असलेल्या कंपनीची ही पहिलीच इलेक्ट्रिक बाईक आहे. कंपनीने EICMA 2023 या इव्हेंटमध्ये Himalayan 452च लॉन्च केलीय. ही बाईक रॉयल एनफिल्ड लिक्विड कूल इंजिनसह येणारी पहिली बाईक आहे. (Latest News)

कंपनी रॉयल एनफिल्ड या बाईकसोबत प्रीमियम घटक देते, यामुळे ही बाईक उत्तम ऑफ-रोडर मोटरसायकल आहे. या बाईक सध्या बाजारात असलेल्या हिमालयन ४११ पेक्षा वेगळं बनवण्यात आलंय. बऱ्याच प्रतीक्षेनंतर कंपनीने आपली इलेक्ट्रिक बाईक ग्राहकांच्या भेटीला आणलीय. ही बाईक तुम्हाला हिमालया या बाईकची आठवण करून देईल. रॉयल एनफिल्डची इलेक्ट्रिक बाईक सध्याच्या हिमालयन आणि हिमालयन 452 पेक्षा थोडी वेगळी आहे. त्याची विंडशील्ड दोन्ही हिमालयांपेक्षा मोठी आहे. चार्जिंग पोर्ट हे इंधन टाकीची कॅप जवळ असेल. ही इलेक्ट्रिक बाईकला गोल्डन युएसडी फोर्क मिळेल. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

रॉयल एनफील्ड हिमालयन 452 चे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे यामध्ये जुन्या हिमालयन 411 चा कोणताही भाग वापरण्यात आलेला नाही. ही एकदम नवीन बाईक आहे. कंपनीने अधिकृत वेबसाइटवर बुकिंगही सुरू केले आहे. ही बाईक २४नोव्हेंबरपासून बाजारात उपलब्ध होण्याची शक्यता आहे. दरम्यान कंपनीने या बाईकची किंमत जाहीर केलेली नाही. कंपनीने नवीन हिमालयन 452 ही पाच नवीन रंगांमध्ये सादर केलीय. Hanle Black, Kamet White, Slate Himalayan Salt, Slate Poppy Blue आणि Kaza Brown या रंगात ही बाईक उपलब्ध होणार आहे.

या बाईकला ४५२ सीसीचं लिक्विड कूल्ड सिंगल सिलेंडर इंजिन मिळेल. जे फोर व्हॉल्ससह येत असतात. हे इंजिन ८ हजार आरपीएम वर ४०.०२ पीएसची जास्ती जास्त ऊर्जा आणि ५५०० आरपीएमवर ४० एनएमचं जास्तीत जास्त टॉर्क जनरेट करत असते. कंपनीने इलेक्ट्रिक स्टार्ट देण्यात आलाय. यासह या बाईकला सहा स्पीड गिअर बॉक्स देण्यात आले आहेत. नवी हिमालयन मध्ये १७ लीटरचं इंधन क्षमता देण्यात आलीय.

या बाईकचा समोरील टायर २१ इंच व्हील आणि रिअर टायर १७ इंचचे देण्यात आले आहे. तसेच या बाईकला अॅण्टी लॉक ब्रेकिंग सिस्टम देण्यात येणार आहे. कंपनीने या बाईक डुअल चॅनल एबीएस देण्यात आलंय. कंपनीने या बाईकला एलईडी लॅम्प दिलाय. तर इंटीग्रेटेड टर्न आणि टेल लॅम्प दिले आहेत.

Himalayan 452
Mileage Bikes: एकदा टाकी फुल करा, संपूर्ण मुंबई फिरता येईल; जबरदस्त मायलेज देते Hero ची 'ही' बाईक

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com