Upcoming Bikes : रॉयल एनफील्ड हिमालयन 450 सह येत आहेत 'या' जबरदस्त बाईक्स, पाहा संपूर्ण लिस्ट

Royal Enfield Upcoming Bikes : रॉयल एनफील्ड हिमालयन 450 सह येत आहेत 'या' जबरदस्त बाईक्स
Royal Enfield Upcoming Bikes
Royal Enfield Upcoming BikesRoyal Enfield Upcoming Bikes
Published On

देशात दमदार आणि स्टायलिश बाईकचा एक वेगळा चाहता वर्ग आहे. यामध्ये रॉयल एनफील्ड बाईकची मोठी क्रेज आहे. अशातच लवकरच भारतीय बाजारपेठेत Himalayan 450 लॉन्च होणार आहे. या अपकमिंग बाईकचे अनेक फीचर्सही लीक झाले आहेत. बाईकमध्ये 450 सीसी लिक्विड-कूल्ड आणि सिंगल-सिलेंडर इंजिन मिळेल. ही बाईक 40bhp ची जास्तीत जास्त पॉवर आणि 40Nm चा टॉर्क जनरेट करेल. नवीन हिमालयन 450 मध्ये वायर स्पोक व्हीलवर ड्युअल पर्पज टायर मिळतील, जे ट्यूबलेस नसतील. यासोबतच वर्तुळाकार एलईडी हेडलॅम्प बाईकला जबरदस्त लूक देईल. या बाईकसोबतच भारतात आणखीही दमदार बाईक लॉन्च होणार आहे, याचबद्दल अधिक माहिती जाणून घेऊ... (Upcoming Bikes 2023 )

येत आहे अपडेटेड यामाहा MT-15 V2

यामाहा आपली नवीन अपडेटेड बाईक MT-15 V2 स्पोर्टी लूकमध्ये सादर करणार आहे. ही बाईक 155cc VVA लिक्विड कूल्ड इंजिनद्वारे समर्थित आहे. याची किंमत 3000 ते 5000 रुपयांपर्यंत वाढू शकते. सध्या याचा जुन्या मॉडेलची किंमत 1,64,400 रुपये आहे. (Latest Marathi News)

Royal Enfield Upcoming Bikes
Uddhav Thackeray यांच्या आडनावावरच्या टीकेवर Chandrashekhar Bawankule यांची प्रतिक्रिया

डुकाटी इलेक्ट्रिक बाईक

ऑटोमोबाईल कंपनी डुकाटी पुन्हा एकदा भारतीय बाजारपेठेत आपला दबदबा निर्माण करण्याच्या प्रयत्नात आहे. कंपनी लवकरच आपली नवीन इलेक्ट्रिक बाईक सादर करणार आहे. नवीन इलेक्ट्रिक बाईक सध्याच्या Streetfighter V4 सारखीच असेल आणि याचे इंधन टाकीऐवजी बॅटरी पॅक दिसेल. ही बाईक पूर्ण चार्ज केल्यावर 250 किमी पर्यंतचे अंतर कापू शकते आणि तिचा टॉप स्पीड 199 किमी/तास असेल.

Royal Enfield Upcoming Bikes
Viral News : प्रवाशांच्या 'या' चुकीमुळे रेल्वेच्या तिजोरीत जमा झाले तब्बल 70 कोटी रुपये, जाणून घ्या कसे?

टीव्हीएस आयक्यूव्ही एसटी

TVS IQV ST एप्रिलमध्ये सादर केली जाऊ शकते, याआधी ही स्कूटर मार्चमध्ये सादर केली जाणार होती. यामध्ये 4.56kwh ची Mithion बॅटरी देण्यात आली आहे. सामान्य चार्जिंगसह ही बाईक 4 तासांमध्ये 80 टक्के चार्ज होईल. याशिवाय ही बाईक145 किमीची राइडिंग रेंज देईल, असा दावा कंपनीने केला आहे. ही स्कूटर ताशी 82 किलोमीटचा वेग पकडू शकते. कंपनी 1.25 लाख रुपयांच्या प्रारंभिक किंमतीसह ही स्कूटर ऑफर करू शकते.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com