Latest EV Bike : मुंबई-पुणेचा १५०किमीचा प्रवास होईल खास; Gogoro CrossOverची इलेक्ट्रिक बाईक लॉन्च

Gogoro CrossOver: गोगोरो (Gogoro) कंपनी लॉन्च केलेली बाईक ही सर्व रोडवर धावू शकणारी बाईक आहे.
Gogoro Crosover
Gogoro Crosoversaam Tv
Published On

Gogoro crossover Electric Bike:

सध्या इलेक्ट्रिक वाहनांचं चलन वाढलंय. मग बाईक असो किंवा कार असो. शहारातील वाढलेल्या ट्रॉफिकमुळे अनेकांचा ओढा हा मोपेड बाईककडे असतो. अशाच प्रमाणे काही इलेक्ट्रिक बाईक ह्या शहारातच चालवण्यासाठी उपयोगी असतात. परंतु गोगोरो (Gogoro) कंपनी लॉन्च केलेली बाईक ही सर्व ठिकाणी धावणारी बाईक आहे. (Latest News)

गोगोरो ने आपली एक इलेक्ट्रिक बाईक गोगोरो क्रॉसओव्हर Gogoro (CrossOver) बाजारात लॉन्च केलीय. या बाईकला टू-व्हील इलेक्ट्रिक एसयूवीच्या पद्धतीने प्रमोट केलंय. क्रॉसओव्हर CrossOverचं डिझाइन हे खूप वेगळं करण्यात आलंय. या पहिल्या टू-व्हील एसयूवीमध्ये स्टोरेजसाठी जागा देण्यात आलीय. याचा उपयोग आपण विविध कार्यासाठी करू शकतो. आज आपण या Gogoro CrossOver बाईकच्या वैशिष्ट्यांविषयी जाणून घेणार आहोत.('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

गोगोरोने क्रॉसओव्हर इलेक्ट्रिक बाईकची किमत काय असेल याची माहिती देण्यात आलेली नाहीये. परंतु किमतीविषयी लवकरच अपडेट दिली जाणार आहे. ही नवी बाईक दोन प्रकारात उपलब्ध करून देण्यात आलीय. क्रॉसओव्हर आणि क्रॉसओव्हर एस या नावाने ही दुचाकी लॉन्च करण्यात आलीय.

या बाईकचं पावर आऊटपुट ७.० kW आहे. तर क्रॉसओव्हर एसचं पावर आऊटपुट ७.६ kW आहे. या दोन्ही बाईक ६० ते ७० किमी प्रतितासच्या गतीने धावू शकते. एकदा फूल चार्ज केल्यानंतर ही बाईक ३० किमी प्रति तासच्या स्पीडने १५० किमीपर्यंतचा प्रवास करू शकते. यामुळे गोगोरो क्रॉसओव्हर एक पावरफूल बॅटरी सेटअप सह एक ड्राइवट्रेन देण्यात आलाय.

गोगोरो क्रॉसओव्हर बाईक ही चांगली डिझाइन आणि फॉर्म फॅक्टरसह आरामदायी आहे. जर तुमच्या गावाचा रस्ता व्यवस्थित नसेल तरीर Gogoro CrossOverची बाईक जोरात धावेल. कारण कंपनीने बाईकची चेसिस ऑफ रोडसाठी उपयुक्त राहील अशी बनवण्यात आलीय. या बाईकचा ग्राउंड क्लिअरेन्स १४.२ आहे.

इलेक्ट्रॉनिक स्कूटरला सामान ठेवण्यासाठी म्हणजे लगेज देण्यासाठी आलेली काही सोय ही खूप उपयुक्त आहे. ज्या लोकांचा काही वस्तू एका जागेवरून दुसऱ्या ठिकाणी न्यायच्या आहेत. त्या लोकांसाठी ही बाईक उपयुक्त ठरणार आहे. वस्तू वाहण्यासाठी जे फ्रेम देण्यात आलीय ती स्टीलची आहे.

या बाईकचे रिअर पार्ट हे ट्यूबलर फ्रेमसह देण्यात आलेत. तर या बाईकमध्ये एलईडी हेडलाईट आणि रिमूव्हेबल स्प्लिट पॅसेंजर सीटच्या आत कॉम्पेट लगेज रेक देण्यात आलीय. गोगोरो कंपनीच्या मते, या बाईकला २५ पाईंट देण्यात आले आहेत. यामुळे कार्गोला ई-स्कूटरशी जोडता येईल.

Gogoro Crosover
Diwali Car Deals In November : दिवाळीचा धमाका! जबरदस्त मायलेज, दमदार रेंजसह या कारवर मिळतेय विशेष सूट; लिस्ट पाहा

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com