Wedding viral video saam tv
व्हायरल न्यूज

Viral Video: नवरीच्या एन्ट्रीला आतषबाजी लावणं पडलं महागात; थोडक्यात वाचला जीव, पाहा व्हिडीओ

Wedding viral video: वधूच्या ग्रँड एंट्रीदरम्यान पेटत्या आतषबाजीमुळे मोठा अपघात टळल्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. लग्नसमारंभातील स्टंट्स आणि सुरक्षेच्या नियमांबाबत नव्याने चर्चा सुरू झाली आहे.

Surabhi Jayashree Jagdish

भारतीय लग्नसमारंभांमध्ये सध्या ग्रँड एंट्री, भव्य सजावट आणि आकर्षक इफेक्ट्सचा ट्रेंड वाढताना दिसतोय. मात्र अशाच एका समारंभात घडलेला प्रसंग सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरलाय. वधूच्या एंट्रीदरम्यान पेटत्या आतषबाजीमुळे मोठा अपघात टळल्याचा व्हिडीओ सध्या मोठ्या प्रमाणात शेअर केला जातोय.

सोशल मीडियावर व्हायरल झाला व्हिडीओ

व्हायरल क्लिपमध्ये वधू हातात फुलांचा गुच्छ घेऊन मंडपाकडे जाताना दिसतेय. तिच्या डोक्यावर फुलांनी सजवलेली आणि लाइट्स लावलेली छत्री आहे. परिसरात संगीत आणि नृत्याचा जल्लोष सुरू आहे. पाहुणे हा क्षण कॅमेऱ्यात कैद करत असतानाच अचानक एक व्यक्ती हातात आतषबाजी घेऊन पुढे येताना दिसतो. आणि काही क्षणांत त्यामधून ठिणग्या आणि ज्वाळा येतात.

या ज्वाळा वधूच्या डोक्याच्या अगदी जवळून जातात. काही क्षणांसाठी तिचा लेहंगा पेट घेऊ शकतो, अशी भीती पाहुण्यांना वाटली. मात्र सुदैवाने त्या ज्वाळांनी कोणताही मोठा अपघात झाला नाही. वधूला या धोक्याची जाणीवही होत नाही आणि ती हसत पुढे चालत राहते. तर आसपासचे काही लोक अचानक घाबरलेले दिसून येतात.

हा व्हिडीओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर @gharkekalesh या अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे. सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या या व्हिडीओला दोन लाखांहून अधिक व्ह्यूज मिळाले आहेत.

लोकांनी केल्या विविध कमेंट्स

अनेकांनी या व्हिडीओवर देताना लग्नातील अशा स्टंट्सवर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं जातंय. एका युजरने लिहिलंय, 'लग्नात काहीवेळाच्या आनंदासाठी जीव धोक्यात घालणं योग्य नाही.' तर दुसऱ्याने म्हटलंय, 'सुरक्षेची काळजी न घेतल्यास आनंदाच्या क्षणावर विरजण पडू शकतं.'

लग्नसमारंभांमध्ये आतषबाजी किंवा ज्वलनशील साहित्याचा वापर करताना अत्यंत दक्षता आवश्यक आहे. सजावटीसाठी वापरलं जाणारं कापडी साहित्य, कृत्रिम फुलं किंवा घुंगट यांसारख्या वस्तूंना सहज आग लागू शकते. त्यामुळे कार्यक्रम आयोजकांनी आणि कुटुंबीयांनी सुरक्षेचे नियम पाळणं गरजेचं आहे.

(डिस्क्लेमर- हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या व्हिडीओमध्ये किती तथ्य आहे याची खातरजमा आम्ही करत नाही.)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Nashik Crime: साधूच्या वेशात सोन्याची लूट, भुरळ पाडून लाखोंचे दागिने लंपास; VIDEO व्हायरल

Radha Patil Dance: राधा पाटलावर गुन्हा, ऐश्वर्याला परवानगी नाकारली; कलाकारांचा बिभत्स डान्स आयोजकांनाही भोवणार

MPSC विद्यार्थ्यांचा आक्रोश! पुणे-कोल्हापुरात विद्यार्थी रस्त्यावर, अध्यक्ष अन् सचिवांच्या राजीनाम्याची मागणी

Maharashtra Politics: ठाकरेसेनेचे नगरसेवक बाद करण्याचा डाव? शिंदेसेनेचा मोठा डाव!

Manoj Jarange: मनोज जरांगेंना हल्ल्याची भीती, शिंदेसेनेचे 2 मंत्री आणि 2 प्रवक्यांवर खळबळजनक आरोप

SCROLL FOR NEXT