Divorce  saam tv
व्हायरल न्यूज

Divorce: नवऱ्याने तोंडाला केक लावल्याने नवरी भडकली; लग्नाच्या दुसऱ्याच दिवशी घटस्फोट

Divorce Case: वैवाहिक जीवनात अनेकदा लहान लहान कारणांनी नाते तुटल्याच्या घटना घडल्या आहेत. अनेक कपल लग्नाच्या खूप वर्षांनीदेखील घटस्फोट घेतात. परंतु एका महिलेने चक्क लग्नाच्या दुसऱ्या दिवशीच नवऱ्याला घटस्फोट देण्याचा निर्णय घेतला आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

वैवाहिक जीवनात अनेकदा लहान लहान कारणांनी नाते तुटल्याच्या घटना घडल्या आहेत. अनेक कपल लग्नाच्या खूप वर्षांनीदेखील घटस्फोट घेतात. अगदी शिल्लक कारणांवरुनदेखील टोकाचे निर्णय घेतात. परंतु एका महिलेने चक्क लग्नाच्या दुसऱ्या दिवशीच नवऱ्याला घटस्फोट देण्याचा निर्णय घेतला आहे.

मीडिया रिपोर्टनुसार, महिलेला सुरुवातीपासूनच लग्न करण्याची इच्छा नव्हती. परंतु तिच्या प्रियकराने तिला प्रपोज केले त्यानंतर तिने त्याला होकार दिला. लग्न करण्याचा निर्णय घेतला. दोघांनी मिळून लग्नाचा अर्धा- अर्धा खर्च उचलला. लग्न झाले. परंतु काही शिल्लक कारणांवरुन लग्न मोडले.

महिलेने लग्न करताना एक अट तिच्या नवऱ्यासमोर ठेवली होती. तिने म्हटले होते की, रिसेप्शन पार्टीच्या वेळी माझ्या चेहऱ्याला केक लावायचा नाही. परंतु नवऱ्याने तिच्या तोंडाला केक लावायची चूक केलीत. त्याने नवरीला डोक्याला पकडले आणि तिचे तोंड केकमध्ये ढकलेले. यामुळेच तिने घटस्फोट घेण्याचा निर्णय घेतला.

महिलेने याबाबत माहिती दिली की, मी आधीच सांगितले होते की, माझ्या तोंडाला केक लावायचा नाही. परंतु माझ्या नवऱ्याने आधीच प्लॅनिंग करुन माझ्या तोंडाला केक घासला. यामुळेच मला राग आहे. त्यामुळेच तिने लग्न मोडण्याचा निर्णय घेतला. महिलेच्या कुटुंबियांनी तिला खूप समजवण्याचा प्रयत्न केला. परंतु ही महिला तिच्या निर्णयावर ठाम आहे.महिलेने सांगितले की, तिला क्लॉस्ट्रोफोबिया आहे. त्यामुळे तिने केक न लावण्यास सांगितले होते. मात्र, तिच्या नवऱ्याने तिच्या तोंडाला केक लावला. त्यामुळेच मी हा निर्णय घेतला.

Disclaimer- ही बातमी मीडिया रिपोर्टवर आधारित आहे. साम टीव्ही याची पुष्टी करत नाही.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

बांग्लादेश पुन्हा पेटले, हिंदूची हत्या, विद्यार्थी नेत्याच्या हत्येनंतर हिंसाचार

स्थानिक भाजपला शिंदेसेना नको, भाजपचे मंडळाध्यक्ष इरेला पेटले

नागपुरात पाण्याच्या टाकीचा स्फोट; ६ जणांचा मृत्यू, दुर्घटनेतील मृतांची नावे आली समोर

Warm Water Benefits: जेवल्यानंतर कोमट पाणी पिण्याचे जबरदस्त फायदे

सरकारकडून विद्यार्थ्यांना लॅपटॉप-सायकल फ्री? केंद्र सरकारची विद्यार्थ्यांसाठी नवी योजना?

SCROLL FOR NEXT