राज्यात आज दुसऱ्या टप्प्यातील मतदान (Maharashtra Election) पार पडत आहे. आज विविध जिल्ह्यांमध्ये नवरदेवांनी लग्न सोडून मतदानाचा हक्क बजावला आहे. वर्ध्याच्या हिंगणघाट तालुक्यातील पिंपळगाव येथील प्रफुल बाबाराव राऊत या युवकाचे आज लग्न आहे. चंद्रपूर जिल्ह्यात वरोरा येथे लग्न असताना वरात निघाली, पण 'आधी लगीन लोकशाहीचं' म्हणत या नवरदेवाने मतदानाचे कर्तव्य बजावलं ( Lok Sabha 2024) आहे.
गणेश नगर हिंगणघाट येथील रहिवासी सिव्हिल इंजिनियर जगदीश वैद्य यांनी आज २६१ मतदान केंद्र हिंगणघाट येथे लग्नाआधी आपला अधिकार बजावला आहे. मतदानानंतर ते पुढील लग्नकार्य लग्नकार्यात रवाना झाले (Groom Voting Before Wedding) आहे. सध्या महाराष्ट्रात सार्वत्रिक लोकसभा निवडणुका करता मतदान पार पडत आहे.
दुसऱ्या टप्प्यातील बुलढाणा जिल्ह्यातही आज मतदान (Voting) प्रक्रिया पार पडत आहे. आज लग्नाची तारीख असल्याने लग्न मंडपात जाण्याआधी मतदान केंद्रावर जाऊन भुमराळा येथील नवरदेव चिरंजीव सत्यनारायण पऱ्हाड यांनी मतदानाचा हक्क बजावला आहे. बहुल्यावर चढण्याआधी पहिल्यांदा नवरदेवाने आपला राष्ट्रीय हक्क बजावला आहे. त्यानंतर ते लग्नासाठी चिखला काकड तालुका लोणारकडे मार्गस्थ झाले आहेत.
संविधानाने दिलेला हक्क 'पहिलं मतदान आणि नंतर लग्न' असं त्यांनी सांगितलं (Lok Sabha) आहे. देशाच्या विकासासाठी मतदान आपले कर्तव्य आहे, असं त्यांनी सांगितलं आहे. यावेळी नवरदेव सत्यनारायण यांनी जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा भुमराळा येथील मतदान केंद्रावर जाऊन आपला मतदानाचा हक्क बजावला आहे.
लोकशाहीतले सर्वात प्रभावी अस्त्र म्हणजे मतदान आणि लोकशाहीने दिलेला हा (Maharashtra Politics) अधिकार आहे. या अधिकार बजावण्यासाठी यवतमाळ जिल्ह्यातील नेर येथे नवरदेव लग्नाचे कपडे घालून मतदान केंद्रावर पोहचला होता. त्यानंतर त्यानी मतदान केंद्रावर जाऊन मतदान केलं. आधी लगीन लोकशाहीचं हा संदेश त्यानी दिला आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.