Lok Sabha Election: घरून कसे कराल मतदान? जाणून घ्या Vote From Homeची प्रक्रिया आणि पात्रता

Vote From Home : निवडणूक आयोगाने ज्येष्ठ नागरिकांना म्हणजेच ८५ वर्षांपेक्षा जास्त वयाच्या मतदारांना घरबसल्या पोस्टल बॅलेटद्वारे मतदान करण्याचा पर्याय दिलाय. ज्येष्ठ नागरिकांनी निवडणूक प्रक्रियेत सक्रिय सहभाग घ्यावा, त्यांना निवडणूक केंद्रापर्यंत पोहोचण्यात अडचण येते. त्यामुळे आम्ही त्यांना घरबसल्या मतदानाचा पर्याय देण्यात आल्याचं मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार म्हणालेत.
Vote From Home
Vote From HomeYandex

Vote From Home Lok Sabha Election :

लोकसभा निवडणूक २०२४ पडघम वाजू लागले आहेत. राजकीय पक्षांकडून बैठकांचा सपाटा लावला जात आहे.दरम्यान यावेळी मतदान १९ एप्रिल सुरू होणार असून १ जूनला मतदान प्रक्रिया पार पडणार आहे. देशात ९७ कोटी पेक्षा जास्त मतदार आहेत. यात बहुसंख्या मतदार हे वृद्ध आणि दिव्यांग मतदार आहेत.

या मतदारांच्या सोयीसाठी निवडणूक आयोग घरातून मतदान करण्याची मुंभा देणार आहे. पण घरून मतदान कोण शकणार आहे किंवा कशाप्रकरे मतदान केले जाणार आहे, याची प्रक्रिया जाणून घेणार आहोत. (Latest News)

निवडणूक आयोगाने ज्येष्ठ नागरिकांना म्हणजेच ८५ वर्षांपेक्षा जास्त वयाच्या मतदारांना घरबसल्या पोस्टल बॅलेटद्वारे मतदान करण्याचा पर्याय दिलाय. ४० टक्क्यांपेक्षा जास्त अपंगत्व असलेल्या व्यक्तींसाठीही हीच सुविधा उपलब्ध करून दिली जाणार आहे. ज्येष्ठ नागरिकांनी निवडणूक प्रक्रियेत सक्रिय सहभाग घ्यावा, त्यांना निवडणूक केंद्रापर्यंत पोहोचण्यात अडचण येते. त्यामुळे आम्ही त्यांना घरबसल्या मतदानाचा पर्याय देण्यात आल्याचं मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार म्हणालेत.

ज्या कोणत्याही ज्येष्ठ नागरिक किंवा अपंग मतदार व्यक्ती घरून मतदान करू इच्छित आहेत. त्यांनी निवडणूक अधिसूचना जारी झाल्यापासून ५ दिवसांच्या आत निवडणूक आयोगाकडे फॉर्म १४D दाखल करावा. भारत निवडणूक आयोगाच्या मते १० मार्च २०२४ पर्यंत देशात ८५ वर्षांपेक्षा जास्त वयाचे ८१.८७ लाख ज्येष्ठ नागरिक मतदार होते. १०० वर्षे ओलांडलेल्या मतदारांची संख्या २.१८ लाख होती. अपंग मतदारांची संख्या ८८.३५ लाख होती.

घरबसल्या मतदानासाठी जास्त अडचणी येत नाहीत. जिल्हा निवडणूक अधिकारी म्हणजेच जिल्हाधिकारी घरगुती मतदानाची तारीख ठरवतात. हे मतदान मतदानाच्या नियोजित तारखेच्या आदल्या दिवशी होत असते. वृद्ध आणि अपंग मतदारांना पोस्टल मतपत्रिका घरपोच पुरवल्या जातात. येथे ते त्यांच्या पसंतीच्या उमेदवाराला मतदान करू शकतात.

निवडणूक अधिकारी एक व्हिडिओग्राफर आणि पोलीसदेखील निवडणूक प्रक्रियेच्या निष्पक्षतेची खात्री करण्यासाठी हजर राहत असतात. मतदानाची गोपनीयता ठेवण्यासाठी एक विभाजन देखील असते. दरम्यान मतदान करण्याच्या या संपूर्ण प्रक्रियेला केवळ २० मिनिटे लागतात. पोस्टल मतपत्रिकेद्वारे मतमोजणी केली जाते.

Vote From Home
Lok sabha Election : लोकसभा निवडणुकीच्या जागावाटपावर महाविकास आघाडीची महत्वाची बैठक; 'वंचित'च्या भूमिकेवर काय निर्णय घेणार?

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com