उन्हाळा हा बिअरप्रेमींचा सीझन मानला जातो. बाहेर गरम वातावरण असताना थंडगार बिअर घेण्याची मजा काही औरच असते. तरुणांसह वृद्धांपर्यंत अनेकजण बिअरचे शौकिन आहेत. काहींची तर सुरुवात बिअरनेच होते. उन्हाळ्याच्या दिवसात थंड बिअरसाठी दुकानांवर लांब रांगा लागतात. अनेकजण थंडगार बिअरसाठी अधिक पैसे द्यायला तयार असतात. पण आपल्या आजोबांच्या किंवा वडिलांच्या काळात बिअरची किंमत किती होती? असा प्रश्न तुम्हाला कधी पडला आहे का?
सोशल मीडियावर एक पोस्ट व्हायरल होत आहे. या पोस्टमध्ये ३२-३३ वर्ष जुने बिअरचे बिल पाहायला मिळते. यात एका बिअर बॉटलची किंमत लिहिलेली दिसते. या व्हायरल पोस्टमधील बिलानुसार, १९८९ मध्ये बिअरची किंमत ३३ रुपये इतकी होती. आता ३३ रुपयांमध्ये बिअरची एक छोटी बाटली (पॉईंट) देखील येणार नाही.
व्हायरल बिलमध्ये हॉटेल अलका असा उल्लेख पाहायला मिळतो. यात ९ नोव्हेंबर १९८९ अशी तारीख देखील दिसते. यातील एका बिलामध्ये एका बिअर बाटलीची किंमत ३३ रुपये आहे, तर दुसऱ्या बिलात बाटलीची किंमत ३२ रुपये लिहिलेली आहे. ३३ वर्ष जुना बिअरच्या बाटलीच्या बिलाचा फोटो सोशल मीडियावर चर्चेचा विषय बनला आहे.
बिअरच्या बिलाचे हे फोटो @neharikasharmaa या एक्स अकाउंटवर पोस्ट करण्यात आले होते. या फोटोच्या कॅप्शनमध्ये ३३ वर्षांपूर्वी बिअरची एक बाटली फक्त ३३ रुपयांना मिळत होती. १९८९ चे बिल व्हायरल झाल्यानंतर नेटकऱ्यांनी त्यावर प्रतिक्रिया दिल्या आहेत. काहींनी बिलावरुन खिल्ली उडवली आहे. तर काहींनी आता बिअरची किंमत किती वाढली आहे, असे म्हटले आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.