Supriya Sule Banner At Times Square Saam Tv
व्हायरल न्यूज

Times Square Viral Video: सातासमुद्रापार सुप्रिया सुळेंची चर्चा! टाईम्स स्क्वेअरवर झळकले विजयाचे बॅनर; VIDEO VIRAL

Supriya Sule Banner At Times Square: दोन दिवसापूर्वी लोकसभा निवडणुकीचा निकाल लागला. त्यात संपूर्ण देशाचे लक्ष बारामती मतदारसंघाकडे होते. बारामतीमधून सुप्रिया सुळे दीड लाख मताधिक्याने विजयी झाल्या आहेत.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

४ जून रोजी लोकसभा निवडणुकीचा निकाल जाहीर झाला. यात सर्वांचे लक्ष महाराष्ट्रातील बारामती मतदारसंघाकडे होते. बारामती मतदारसंघात नणंद विरुद्ध भावजय म्हणजेच सुनेत्रा पवार विरुद्ध सुप्रिया सुळे अशी लढत होती. या निवडणुकीच सुप्रिया सुळे जवळपास १ लाखांहून अधिक मताधिक्यानने निवडून आल्या आहेत. सुप्रिया सुळे यांचे फक्त महाराष्ट्रातून नव्हे तर संपूर्ण जगभरात अभिनंदन केले जात आहे. सुप्रिया सुळेंसाठी अभिनंदनाचे बॅनर न्यु यॉर्क मधील टाईम्स स्क्वेअरवर झळकले आहेत.

न्यू यॉर्कमधील टाईम्स स्क्वेअर (New York Times Square) हा खूप प्रसिद्ध आहे. येथे अनेक लोकांचे फोटो-पोस्ट दाखवल्या जातात. तर आता लोकसभा निवडणुकीनंतर सुप्रिया सुळे आणि शरद पवारांचे बॅनर टाईम्स स्क्वेअरवर झळकले आहेत. त्यामुळे पवार कुटुंबियाची लोकप्रियता संपूर्ण जगभरात आहे.

सुप्रिया सुळे आणि शरद पवार (Sharad Pawar) यांचे पोस्टर परीक्षित तळोकार यांनी लावले होते. सुप्रिया सुळे यांच्या फॅनपेजवरुन हा व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर करण्यात आला आहे. यावेळी सुप्रिया ताईंना विजयासाठी शुभेच्छा देण्यात आल्या आहेत.

सुप्रिया सुळे आणि सुनेत्रा पवार यांच्यात खूप जोरदार लढत होती. बारामती मतदारसंघात पवार कुटुंबातील दोघजण पहिल्यांदाच आमने- सामने पाहायला मिळाले. त्यामुळे सर्वांचेच या मतदारसंघाकडे विशेष लक्ष होते. सुप्रिया सुळे यांच्या विजयानंतर कार्यकर्त्यांनी मोठ्या जल्लोषात विजय साजरा केला . सुप्रिया सुळेंच्या या व्हिडिओवर कार्यकर्त्यांनी लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव केला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Truck Fire: राष्ट्रीय महामार्गावर धावत्या खाद्यतेलाच्या ट्रकला भीषण आग, वाहतूक विस्कळीत

जिंकलात तर यंत्रणा प्रामाणिक अन् हरलात तर फेरफार कशी? निवडणूक आयोगाच्या समर्थनार्थ १२४ IAS अधिकारी मैदानात

Blood Sugar Control Tips: ब्लड शुगर कमी करण्यासाठी दररोज किती वेळ चालावे? जाणून घ्या नियमित चालण्याचे सोपे नियम

Bay Leaf Water For Kidney Stones: किडनी स्टोनवर तेजपत्याच्या पाण्याचा घरगुती उपाय, एकदा नक्की करून पाहा

Saree Designs: महिलांनी नऊरात्रीत नेसा 9 प्रकारच्या 9 साड्या, लेटेस्ट डिझाईन्स पाहा

SCROLL FOR NEXT