Baramati Lok sabha : बारामतीत सुप्रिया सुळे दीड लाखांच्या मताधिक्याने जिंकल्या, अजित पवार गटाचं गणित कुठं फसलं?

baramati lok sabha constituency : बारामती लोकसभा मतदारसंघात अजित पवार गटाच्या उमेदवार सुनेत्रा पवार यांना मोठा धक्का बसला. बारामतीत सुनेत्रा पवार दीड लाखांच्या मताधिक्याने पराभूत झाल्या.
बारामतीत सुप्रिया सुळे दीड लाखांच्या मताधिक्याने जिंकल्या, अजित पवार गटाचं गणित कुठं फसलं?
Supriya Sule Leading Against Sunetra PawarSaam TV

सचिन जाधव, साम टीव्ही प्रतिनिधी

बारामती : लोकसभा निवडणुकीत बारामती मतदारसंघात सुप्रिया सुळे दीड लाखांपेक्षा अधिक मतांनी जिंकल्या. सुप्रिया सुळे यांनी दीड लाखांच्या मताधिक्याने अजित पवार गटाच्या उमेदवार सूनेत्रा पवार यांचा दारुण पराभव केला. अजित पवार गटाने निकालाआधीच सूनेत्रा पवार खासदार होतील, असा विश्वास व्यक्त केला होता. बारामतीमधील प्रतिष्ठेच्या लढाईत सुप्रिया सुळेंनी अजित पवार गटाला धूळ चारली. या मतदारसंघात अजित पवार गटाचं गणित कुठं फसलं, याची आकडेवारी समोर आली आहे.

बारामती लोकसभा मतदारसंघात सुप्रिया सुळे या 1 लाख 53 हजार 048 मतांनी विजयी झाल्या. बारातमी मतदारसंघातील खडकवासला वगळता इतर कुठल्याही विधानसभा मतदारसंघात सुनेत्रा पवार यांना लीड मिळालं नाही. मतदारसंघातील पाच विधानसभा मतदारसंघात सुप्रिया सुळे यांनाच मताधिक्य मिळालं. सुप्रिया सुळे यांना इंदापूर,दौंड,पुरंदर,भोर वेल्हा मुळशी आणि बारामतीमध्ये मताधिक्य मिळालं.

बारामतीत सुप्रिया सुळे दीड लाखांच्या मताधिक्याने जिंकल्या, अजित पवार गटाचं गणित कुठं फसलं?
World Environment Day: लोकसभा निकालानंतर PM मोदी अॅक्शनमोडमध्ये; देशभरात आईच्या नावाने सुरु केलं नव अभियान

बारामतीत सर्व नेते एकीकडे आणि मतदार एकीकडे चित्र होतं. त्यामुळे ही निवडणूक लढत चुरशीची झाली होती. सुप्रिया सुळे यांचा विजय झाल्यांतर विधानसभा निवडणुकीत चित्र वेगळं दिसण्याची शक्यता आहे. दौंड, इंदापूरमध्ये सत्ताधारी आमदार एकत्र काम करत होते, तरी या मतदारसंघात सुप्रिया सुळे यांना मताधिक्य चांगलं मिळालं. त्यामुळे आगामी बारामती लोकसभा मतदारसंघातील विधानसभेमध्ये लढती चुरशीच्या होण्याची शक्यता आहे.

मतदारसंघानुसार आकडेवारी

भोर 41,625 लीड - सुप्रिया सुळे

बारामती 48,168 लीड - सुप्रिया सुळे

पुरंदर 34,387 लीड - सुप्रिया सुळे

इंदापूर 25, 689 लीड - सुप्रिया सुळे

दौंड 24,267 लीड - सुप्रिया सुळे

खडकवासला 21,696 लीड - सुनेत्रा पवार

बारामतीत सुप्रिया सुळे दीड लाखांच्या मताधिक्याने जिंकल्या, अजित पवार गटाचं गणित कुठं फसलं?
Sunil Tatkare: आगामी विधानसभेसाठी अजित पवार गटाने बांधला चंग; बैठकीनंतर सुनिल तटकरेंनी सांगितला प्लान

अंतिम मतदान

सुप्रिया सुळे - 7,28,068

सुनेत्रा पवार - 5,74,538

सुप्रिया सुळे 1 लाख 53 हजार 048 मतांनी विजयी

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com