Ajit Pawar Group : लोकसभा निवडणुकीतील पराभवानंतर अजित पवार गटाचं चिंतन; बैठकीत कोणत्या मुद्द्यावर झाली चर्चा?

maharashtra Politics : लोकसभेतील पराभवानंतर अजित पवार यांच्या देवगिरी बंगल्यावर आमदारांची बैठक झाली. या बैठकीत आमदारांनी चिंता व्यक्त केली. या बैठकीत विविध विषयांवर चर्चा झाली.
लोकसभा निवडणुकीतील पराभवानंतर अजित पवार गटाचं चिंतन; बैठकीत कोणत्या मुद्द्यावर झाली चर्चा?
Ajit Pawar Group :Saam tv

सचिन गाड, साम टीव्ही प्रतिनिधी

मुंबई : लोकसभा निवडणुकीत अजित पवार गटाला ४ जागापैकी १ जागा जिंकण्यात यश आलं. अजित पवार गटाने फक्त रायगडमध्ये बाजी मारली. लोकसभा निवडणुकीत रायगडमध्ये सुनील तटकरे यांनी ठाकरे गटाच्या अनंत गिते यांचा पराभव केला. यंदाच्या लोकसभा निवडणुकीत महायुतीला मोठं अपयश आलं. या पराभवानंतर अजित पवार गटाची पहिली बैठक झाली. या बैठकीत अजित पवार गटाच्या नेत्यांनी निकालाविषयी चिंता व्यक्त केली. नेत्यांकडून बैठकीत काही मतदारसंघात युती असून मतांमध्ये रुपांतर न झाल्याने चिंता व्यक्त करण्यात आली.

लोकसभा निवडणुकीतील पराभवानंतर अजित पवार गटाच्या आमदारांची देवगिरी बंगल्यावर बैठक झाली. या बैठकीत प्रमुख नेत्यांनी पराभविषयी मोठी चिंता व्यक्त केली. या बैठकीत संविधान बदलाचं नॅरेटीव्ह आणि जातीय समीकरणाचा फटका बसल्याचा काही नेत्यांचा सूर होता.

लोकसभा निवडणुकीतील पराभवानंतर अजित पवार गटाचं चिंतन; बैठकीत कोणत्या मुद्द्यावर झाली चर्चा?
Bhavana Gawali News: 'CM शिंदेंसह पक्षावर दबाव, अशा स्क्रिप्ट हिताच्या नसतात..' राजश्री पाटलांच्या पराभवानंतर भावना गवळी थेट बोलल्या!

बैठकीत काही लोकसभा मतदारसंघात महायुती असून मित्रपक्षांचे मतांमध्ये रुपांतर झालं नाही, अशी चिंता व्यक्त करण्यात आली. काही विधानसभा मतदारसंघात युतीचे नेते एकत्र होते, पण स्थानिक पातळींवर कार्यकर्त्यांनी मते न दिल्याची स्थिती यावर काही नेत्यांचा बैठकीत सूर उमटला. काही विधानसभेत युतीमधील पक्षांची मते रुपांतरीत न झाल्याबद्दल चिंता व्यक्त करण्यात आली.

लोकसभा निवडणुकीतील पराभवानंतर अजित पवार गटाचं चिंतन; बैठकीत कोणत्या मुद्द्यावर झाली चर्चा?
Mumbai News: पवईमध्ये अतिक्रमण कारवाईदरम्यान दगडफेक, ५ पोलिस जखमी

राज्यात मंत्रिमंडळाचा विस्तार करा, अजित पवार गटाची मागणी

अजित पवार गटाने पराभवानंतर आयोजित केलेल्या बैठकीत मंत्रिपदाची आशा व्यक्त करण्यात आली आहे. महाराष्ट्रातील रखडलेला मंत्रिमंडळ विस्तार करा, अशी मागणी अजित पवार गटाने केली आहे. महाराष्ट्रातील परिस्थिती बदलायची असेल तर, १५ दिवसांत मंत्रिमंडळ विस्तार करण्याची मागणी नेत्यांनी अजित पवारांकडे केली आहे. तसेच एक राज्य मंत्री आणि एक कॅबिनेट पदाची ही मागणी कोर कमिटीच्या बैठकित करण्यात आली.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com