Powai News: पवईमध्ये अतिक्रमण कारवाईदरम्यान दगडफेक, ५ पोलिस जखमी

Stone Pelting In Mumbai's Powai Area: पवईच्या जय भीमनगर परिसरामध्ये पालिका कर्मचारी पोलिसांच्या मदतीने अतिक्रमण कारवाई करत होते. या कारवाईदरम्यान स्थानिकांनी दगडफेक केली. या दगडफेकीमध्ये ५ पोलिस जखमी झालेत.
Mumbai News: पवईमध्ये अतिक्रमण कारवाईदरम्यान दगडफेक, ५ पोलिस जखमी
Stone Pelting During Encroachment Operation In Mumbai's PowaiSaam Tv

मयूर राणे, मुंबई

मुंबईमध्ये अतिक्रमण कारवाईदरम्यान नागरिकांनी दगडफेक केल्याची घटना समोर आली आहे. मुंबईतल्या पवई परिसरात ही घटना घडली आहे. अतिक्रमण कारवाई करत असताना पालिका कर्मचारी आणि पोलिसांवर दगडफेक करण्यात आली आहे. या दगडफेकीमध्ये ५ पोलिस जखमी झाले आहे. घटनास्थळावर स्थानिकांकडून आंदोलन सुरू होते. त्याचवेळी ही घटना घडली आहे. सध्या घटनास्थळी पोलिसांचा कडक पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, पवईतल्या जय भीम नगर परिसरामध्ये पालिकेकडून अतिक्रमण कारवाई सुरू आहे. अतिक्रमण कारवाईला स्थानिक नागरिकांनी विरोध केला. यावेळी नागरिकांनी झोपडपट्टी वाचवण्यासाठी आंदोलन केले. अतिक्रमण काढत असताना संतप्त झालेल्या नागरिकांनी पालिका कर्मचारी आणि पोलिसांवर दगडफेक केली. अतिक्रमण विरोधी पथकावर स्थानिकांनी केलेल्या दगडफेकीमध्ये ५ ते ६ पोलिस जखमी झाले आहेत.

Mumbai News: पवईमध्ये अतिक्रमण कारवाईदरम्यान दगडफेक, ५ पोलिस जखमी
Mumbai Hoarding Collapsed: मोठी बातमी! मुंबईमध्ये पुन्हा होर्डिंग कोसळल्याची घटना; एक व्यक्ती गंभीर जखमी

पवईच्या जय भीमनगरमध्ये मोठ्याप्रमाणात अतिक्रमण करून झोपड्या बांधण्यात आल्या आहेत. याठिकाणी दिवसेंदिवस अतिक्रमणं वाढत आहेत. याठिकाणच्या अतिक्रणाविरोधात पालिकेकडून आज कारवाई करण्याचा निर्णय घेण्यात आला. अतिक्रमणविरोधी कारवाईसाठी पालिका कर्मचारी पोलिसांसोबत घटनास्थळी दाखल झाले. पालिकेचे पथक घटनास्थळावर येताच स्थानिक नागरिकांनी झोपडपट्टी वाचवा आंदोलन सुरू केले.

Mumbai News: पवईमध्ये अतिक्रमण कारवाईदरम्यान दगडफेक, ५ पोलिस जखमी
Mumbai News: खळबळजनक! विनयभंगाच्या गुन्ह्यातील आरोपीचा आत्महत्येचा प्रयत्न; मुंबई विमानतळावरील घटना

पालिका अधिकारी अतिक्रणविरोधी कारवाई करत असताना झोपडपट्टी वाचवा आंदोलन चिघळले. संतप्त नागरिकांनी पालिका कर्मचाऱ्यांसोबत पोलिसांवर दगडफेक करण्यास सुरूवात केली. दगडफेक करणाऱ्यांमध्ये पुरुषांसोबत स्थानिक महिलांचा देखील समावेश होता. नागरिकांनी पोलिस आणि पालिका अधिकाऱ्यांवर दगडफेक करत त्यांना पळवून लावले. या दगडफेकीमध्ये ५ पोलिस कर्मचारी जखमी झाले आहेत.

Mumbai News: पवईमध्ये अतिक्रमण कारवाईदरम्यान दगडफेक, ५ पोलिस जखमी
Mumbai Alert: अलर्ट! ४५ लाख मुंबईकरांना पावसाळ्यात पुराचा धोका, कारण काय?

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com