संजय जाधव, साम टीव्ही मुंबई
मुंबईमध्ये होर्डिंग कोसळण्याचं सत्र सुरूच आहे. घाटकोपरमध्ये होर्डिंग कोसळल्याची घटना ताजी आहे, असे असतानाच आता मुंबईच्या पश्चिम उपनगरातील मालाड पश्चिम परिसरात देखील एक महाकाय होर्डिंग कोसळल्याची दुर्घटना घडली आहे. बुधवारी (५ जून) रात्री ही घटना घडली आहे. या घटनेमध्ये एक व्यक्ती गंभीर झाला असल्याची माहिती मिळत आहे.
बुधवारी रात्री मालाड पश्चिम परिसरातील (Malad West Area) चाचा नेहरू मैदान परिसरात ही घटना घडली आहे. या परिसरात महाकाय होर्डिंग पायी चालणाऱ्या महेंद्र कुरले नावाच्या व्यक्तीवर कोसळले. होर्डिंग वजनदार होते, त्यामुळे या व्यक्तीच्या डोक्याला गंभीर मार लागला आहे. या व्यक्तीला महापालिकेच्या शताब्दी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले (Mumbai News) आहे.
जखमी व्यक्तीवर हापालिकेच्या शताब्दी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. हे होर्डिंग साधारणपणे शंभर बाय दीडशे फूट लांबीचे असल्याची माहिती मिळत आहे. विशेष म्हणजे हे होर्डिंग पालिकेच्या उद्यानातच असल्याचं समोर आलं आहे. बांधकाम व्यावसायिकाने पालिकेची परवानगी न घेता पालिकेच्या उद्यानातच लावले (Mumbai Hoarding Collapsed) होते, अशी माहिती मिळत आहे.
घाटकोपरमध्ये १३ मे रोजी छेडानगर परिसरात होर्डिंग कोसळलं होतं. या दुर्घटनेत १६ पेक्षा जास्त जणांचा मृत्यू झाल्याची घटना घडली होती, तर ६० तासांपेक्षा अधिक काळ तिथे बचावकार्य सुरू होतं. होर्डिंग दुर्घटनेतील आरोपी भावेश भिंडेवर कारवाई सुरू आहे. तर मृत व्यक्तीच्या नातेवाईकांना नुकसान भरपाई सरकारने जाहीर केली होती. त्यानंतर महापालिका प्रशासन अलर्ट मोडवर (Hoarding Collapsed Incident) आले होते. शहरातील अनधिकृत होर्डिंग काढण्याची कारवाई सुरू होती. अशातच आता पुन्हा एक होर्डिंग कोसळल्याची घटना समोर आली आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.