Ghatkopar Hoarding Case: घाटकोपर होर्डिंग दुर्घटना प्रकरण, भावेश भिंडेला २९ मे पर्यंत पोलिस कोठडी

Bhavesh Bhinde Police Custody Extended: १३ मे रोजी वादळी वाऱ्यासह झालेल्या पावसामुळे घाटकोपरच्या इस्टर्न एक्स्प्रेस वेजवळ असलेल्या पेट्रोल पंपावर भलेमोठे होर्डिंग कोसळले होते. या दुर्घटनेतील मृतांचा आकडा वाढला आहे. या दुर्घटनेमध्ये आतापर्यंत १८ जणांचा मृत्यू झाला.
Ghatkopar Hoarding Case: घाटकोपर होर्डिंग दुर्घटना प्रकरण, भावेश भिंडेला २९ मे पर्यंत पोलिस कोठडी
Ghatkopar Hoarding CaseSaam Tv
Published On

घाटकोपर होर्डिंग दुर्घटनेतील (Ghatkopar Hoarding Case) मुख्य आरोपी भावेश भिंडेच्या (Bhavesh Bhinde) पोलिस कोठडीमध्ये वाढ करण्यात आली आहे. भावेश भिंडेची पोलिस कोठडी (Police Custody) २९ मेपर्यंत वाढ करण्यात आली आहे. भावेश भिंडेची पोलिस कोठडी आज संपत असल्यामुळे त्याला किल्ला कोर्टात हजर करण्यात आले होते. कोर्टाने त्याच्या पोलिस कोठडीमध्ये ३ दिवसांची वाढ केली आहे. होर्डिंग दुर्घटना प्रकरणात भावेश भिंडेला राजस्थानच्या उदयपूरमधून पोलिसांनी अटक केली होती.

१३ मे रोजी वादळी वाऱ्यासह झालेल्या पावसामुळे घाटकोपरच्या इस्टर्न एक्स्प्रेस वेजवळ असलेल्या पेट्रोल पंपावर भलेमोठे होर्डिंग कोसळले होते. या दुर्घटनेतील मृतांचा आकडा वाढला आहे. या दुर्घटनेमध्ये आतापर्यंत १८ जणांचा मृत्यू झाला. या घटनेमध्ये गंभीर जखमी झालेल्या एका व्यक्तीचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. या घटनेमध्ये ८० पेक्षा अधिक जण जखमी झालेत. जखमींवर घाटकोपरच्या राजावाडी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. जखमींमधील अनेक जणांची प्रकृती गंभीर आहे.

Ghatkopar Hoarding Case: घाटकोपर होर्डिंग दुर्घटना प्रकरण, भावेश भिंडेला २९ मे पर्यंत पोलिस कोठडी
Central Railway: मध्य रेल्वेमार्गावर ३६ तासांचा मेगाब्लॉक, लांबपल्ल्याच्या ६९ ट्रेन रद्द; पाहा संपूर्ण लिस्ट

घाटकोपर होर्डिंग दुर्घटनेचा तपास करण्यासाठी एसआयटीची स्थापना करण्यात आली आहे. या घटनेनंतर या प्रकरणातील आरोपी भावेश भिंडे फरार झाला होता. लोणावळा, कल्याण, शिळफाटा, अहमदाबाद असा प्रवास करत भावेश भिंडे राजस्थानच्या उदयपूरमध्ये गेला होता. त्याचा कॉल लागत नव्हता. अखेर पोलिसांनी त्याला उदयपूरमधून बेड्या ठोकल्या होत्या. अटकेनंतर त्याला कोर्टात हजर करण्यात आले होते. कोर्टाने त्याला २६ मे पर्यंत पोलिस कोठडी सुनावली होती. आज त्याची पोलिस कोठडी संपल्यामुळे पुन्हा कोर्टात हजर करण्यात आले होते. कोर्टाने त्याची पोलिस कोठडी ३ दिवसांनी वाढवली.

Ghatkopar Hoarding Case: घाटकोपर होर्डिंग दुर्घटना प्रकरण, भावेश भिंडेला २९ मे पर्यंत पोलिस कोठडी
Mumbai Accident News : शीव अपघात प्रकरण: वृद्ध महिलेला कारने चिरडणाऱ्या डॉक्टरला न्यायालयाने सुनावली शिक्षा

घाटकोपर होर्डिंग दुर्घटनेनंतर आता अनधिकृत होर्डिंग्सविरोधात कारवाई करण्यास सुरूवात झाली आहे. बीएमसीकडून फक्त ४०X४० फूटांच्या होर्डिंगला परवानगी आहे. असे असताना देखील भावेश भिंडेने घाटकोपरमध्ये १२० X१२० फुटांचे होर्डिंग लावले होते. हे होर्डिंग अनधिकृत होते. होर्डिंग दुर्घटनेनंतर पालिकेकडून अनधिकृत होर्डिंगविरोधात कारवाई करण्यास सुरूवात केली. पालिकेने १०२५ मोठ्या आणि लहान होर्डिंगचे ऑडिट करण्यास सुरूवात केली आहे.

Ghatkopar Hoarding Case: घाटकोपर होर्डिंग दुर्घटना प्रकरण, भावेश भिंडेला २९ मे पर्यंत पोलिस कोठडी
Pune Porsche Case : पुणे पोर्शे अपघात प्रकरण; आरोपीच्या आजोबाला ४ दिवसांची पोलीस कोठडी

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com