Ajit Pawar: अजितदादांचं मुख्यमंत्रिपदाचं स्वप्न भंगलं? बारामतीच्या पराभवामागे कुणाच्या करामती?

Lok Sabha Result 2024: बारामतीच्या पराभवामुळे अजितदादांचं मुख्यमंत्रीपदाचं स्वप्न भंगलंय. त्यामुळे बारामतीच्या पराभवावरून महायुतीत महाभारत रंगलंय. या पराभवामागे महायुतीतल्याच नेत्यांच्या करामती असल्याचा आरोप अजित पवार गटानं केलाय.
अजितदादांचं मुख्यमंत्रिपदाचं स्वप्न भंगलं? बारामतीच्या पराभवामागे कुणाच्या करामती?
Ajit Pawar Yandex
Published On

लोकसभा निवडणुकीत राज्यात पराभव झाल्यामुळे सत्ताधारी महायुतीतल्या पक्षांनी आता एकमेकांवर खापर फोडण्यास सुरूवार केलीय. याची सुरूवात सर्वात राज्यातच नव्हे तर देशातही सर्वात लक्षवेधी ठरलेल्या बारामतीपासून सुरू झालीय.

सुनेत्रा पवार यांचा बारामतीतल्या पराभवामुळे महायुतीत नवं महाभारत सुरू झाल्याची चर्चा रंगलीय. या पराभवामागे विरोधक नव्हे तर महायुतीतलेच मित्रपक्ष जबाबदार असल्याचे आरोप आता अजित पवार गटानं केलाय. काका पुतण्याच्या या लढाईत शरद पवार गटाच्या सुप्रिया सुळे यांनी अजित पवार गटाच्या सुनेत्रा पवार यांचा लाखभर मतांनी पराभव केला.

अजितदादांचं मुख्यमंत्रिपदाचं स्वप्न भंगलं? बारामतीच्या पराभवामागे कुणाच्या करामती?
Lok Sabha Result 2024: भाजपच्या पराभवाची 10 कारणं, महाराष्ट्रात BJP ला का बसला फटका?

सुप्रिया सुळे यांना 732312 मतं मिळाली तर सुनेत्रा पवार यांना 573979 मतं मिळाली सुनेत्रा पवार यांचा तब्बल 158333 मतांनी दारूण पराभव झाला. शिवसेना आणि भाजपची मतं पूर्णपणे ट्रान्सफर न झाल्यामुळे बारामतीत सुनेत्रा पवारांना पराभवाला सामोरं जावं लागल्याचा दावा अजित पवार गटाचे आमदार अमोल मिटकरींनी केलाय. ते म्हणाले आहेत की, अजितदादांनी विश्वास टाकलेल्यांनी प्रामाणिकपणे काम केले नाही.

यामुळे मात्र अजित पवारांचं लोकसभा निवडणुकीनंतर मुख्यमंत्री होण्याचं स्वप्न भंगल्याची चर्चा आहे. वर्षभरापूर्वी म्हणजे 2 जुलै 2023 ला अजित पवार थेट उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेऊन भाजप-शिवसेना युती सरकारमध्ये सामील झाले. त्यांना महत्त्वाचं अर्थखातंही देण्यात आलं. मात्र त्यावेळी त्यांना मुख्यमंत्रिपदाचं आश्वासन देण्यात आल्याचं सूत्रांचं म्हणणंय.

अजितदादांचं मुख्यमंत्रिपदाचं स्वप्न भंगलं? बारामतीच्या पराभवामागे कुणाच्या करामती?
Maharashtra Politics: लोकसभेतल्या अपयशामुळे राज्यात महायुतीत फूट? विधानसभेसाठी भाजपची एकला चलोची भूमिका?

लोकसभा निवडणुकीत भाजपनं दिल्लीत एकहाती सत्ता काबिज केली तर मुख्यमंत्री बनवण्याचं हे आश्वासन होतं. मात्र बारामतीत अजित पवारांच्याच पत्नीचा पराभव झाल्यामुळे हे स्वप्न भंगल्याची चर्चा रंगलीय. त्यांचं हे स्वप्न भंग करण्यासाठीच बारामतीत पराभव करण्यात आल्याचं बोललं जातंय. बारामतीच्या या पराभवामागे महायुतीत कुणी करामती केल्या आहेत याचीच जोरदार चर्चा आता रंगू लागलीय.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com