Terrifying scene in Bangkok: Road collapses into 50-meter sinkhole, cars and power poles swallowed. saam tv
व्हायरल न्यूज

Shocking Video: वाहनांची रहदारी असतानाच खचला रस्ता; गाड्या थेट पोहोचल्या 'पाताळलोकात', थरकाप उडवणारा व्हिडिओ व्हायरल

Bangkok Sinkhole Disaster : बँकॉकमधील या भयानक व्हिडिओमध्ये रस्त्याचा एक मोठा भाग हळूहळू खचत असल्याचे दिसून येत आहे. रस्ता खचल्यानं अनेक वीज खांब कोसळले आणि पाण्याच्या पाईपलाईन तुटल्या.

Bharat Jadhav

  • बँकॉकमधील वजिरा रुग्णालयाजवळ रस्ता अचानक खचला.

  • खड्डा तब्बल ५० मीटर खोल असल्याचे सांगितले जाते.

  • गाड्या, विजेचे खांब खड्ड्यात कोसळले.

थायलंडची राजधानी बँकॉकमध्ये भयानक घटना घडलीय. या घटनेचा व्हिडिओ पाहून अनेकांच्या अंगाचा थरकाप उडालाय. एक वर्दळीचा रस्ता अचानकपणे खचला. त्यामुळे रस्त्याच्या अधोमध ५० मीटर खोल खड्डा पडला. ही घटना बँकॉकच्या वजिरा रुग्णालयाजवळ घडली. रस्ता खचल्यानंतर रुग्णालयाभोवतालचा परिसर त्वरीत खाली करण्यात आला. मोठा खड्डा पडल्यामुळे वाहतूक पूर्णपणे बंद करण्यात आली.

या घटनेनंतर काही वाहनांची धडक झाली तर रस्त्यामधील खड्ड्यात विजेचे खांब कोसळले. साउथ चायना मॉर्निंग पोस्टच्या वृत्तानुसार, ही घटना बुधवारी पहाटे घडली जेव्हा बँकॉकमधील एका रुग्णालयासमोर ५० मीटर खोल खड्डा पडला, यात गाड्या आणि विजेचे खांब गाडले गेले. रहदारी असताना अचनाकपणे रस्ता खचल्यानं सार्वजनिक रुग्णालयासमोर सुमारे ३० बाय ३० मीटर रुंद आणि ५० मीटर खोल खड्डा तयार झाला.

त्यामुळे सुरक्षेच्या दृष्टीकोनातून जवळच्या फ्लॅटमधील रहिवासी आणि रुग्णालयातील रुग्णांना बाहेर काढण्यात आलं. रस्ता खचत होता तेव्हा रस्त्यावर अनेक वाहने होती. रस्ता खचत असल्याचं लक्षात येताच वाहनधारकांनी ताबोडतोब वाहने तेथून बाजुला करायला सुरूवात केली. ही घटना घडल्यानंतर थायलंडच्या राजधानीमधील वजिरा हॉस्पिटलच्या आसपासचे रस्ते वाहतुकीसाठी बंद करण्यात आले.

रस्त्यात खड्डा पडल्यानं परिसरातील पाईपलाईन फुटल्या. तर तुटलेल्या वीजवाहिन्यांमुळे धोकादायक ठिणग्या उडत होत्या. दरम्यान थायलंडच्या राज्य वृत्तसंस्थेने जारी केलेल्या निवेदनात म्हटले की खड्डा मोठा होत आहे, परंतु या अपघातात कोणत्याही जीवितहानी झाली नाहीये. तेथील प्रशासकीय यंत्रणा आणि बचाव पथक घटनेस्थळी दाखल झाले असून तेथे बचाव कार्य सुरू झाले आहे. व्हिडिओमध्ये दिसत आहे, काही वाहने ताबोडतोब तेथून हटवल्या जात आहेत, तर काही वाहने त्या खड्ड्यात कोसळल्या आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Masala Papad Recipe: हॉटेलस्टाईल मसाला पापड घरी कसा बनवायचा?

Maharashtra Live News Update: पुण्यात शिवसेना उबाठा गटाचे आंदोलन

Pune Politics : अमोल कोल्हे यांना मोठा धक्का; जवळच्या कार्यकर्त्याचा शिवसेनेत प्रवेश, पुण्यातील समीकरण बदलणार?

नाशिकमधील नामांकित ज्वेलरी दुकानात चोरी, नेमकं काय घडलं? पाहा व्हिडिओ

PM Kisan Yojana: महत्त्वाची बातमी! या शेतकऱ्यांना मिळणार नाही पीएम किसानचा पुढचा हप्ता; कारण काय?

SCROLL FOR NEXT