Viral Video Saam Tv
व्हायरल न्यूज

Railway Viral Video: किळसवाणा प्रकार! रेल्वेमध्ये वापरतायत खरकटे प्लेट्स अन् डबे; VIDEO व्हायरल

Amrut Bharat Express Viral Video: अमृत भारत एक्सप्रेसमधील एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. यामध्ये ट्रेनमधील कर्मचारी वापरलेले प्लेट्स आणि बॉक्सचा पुन्हा वापर करतात.

Siddhi Hande

अमृत भारतमधील व्हिडिओ व्हायरल

कचऱ्यातील वापरलेले प्लेट्ल आणि बॉक्सचा पुन्हा वापर

ट्रेनमधील प्रवाशांच्या जीवाशी खेळ

रोज लाखो लोक ट्रेनने प्रवास करतात. सध्या दिवाळीत लाखो नागरिक आपापल्या गावी निघाले आहे. त्यामुळे ते ट्रेनने प्रवास करतात. तुम्हीही ट्रेनने प्रवास करत असाल तर ही बातमी खास तुमच्यासाठी. अमृत भारत एक्सप्रेसमधील एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. यामध्ये ट्रेनमधील कर्मचारी कचऱ्यातील प्लेट्स आणि बॉक्स वापरताना दिसत आहे.

अमृत भारत एक्सप्रेसमधील व्हिडिओ व्हायरल

अमृत भारत एक्सप्रेसमधील हा व्हिडिओ आहे. ज्यात पॅन्ट्री कारमधील कर्मचारी कचऱ्यातील वापरलेले प्लेट्ल आणि बॉक्स धुवून परत वापरत आहेत. हे वापरलेले डिस्पोजेबल प्लेट्स आणि बॉक्स वॉश बेसिनमध्ये धूताना दिसत आहेत. या व्हिडिओ पाहून अनेकांना धक्काच बसला आहे.

रेल्वेतून प्रवास करताना अनेकजण डिस्पोजेबल बॉक्समध्ये खाऊ घेऊन जातात. तसेच स्वतः साठी पेपर प्लेटदेखील घेऊन जातात. या प्लेट्स वापरुन झाल्यावर फेकून देतात. परंतु आता याच फेकलेल्या घाणेरड्या प्लेट्स आणि बॉक्स जर रेल्वे वापरत असेल तर प्रवाशांच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण होत आहे.

अनेक प्रवास ट्रेनमध्ये जेवण ऑर्डर करतात. परंतु या जेवणासाठी असे घाणेरडे प्लेट्स किंवा बॉक्स, डबे वापरले जात असतील तर त्यामुळे प्रवाशांच्या आरोग्याला त्रास होऊ शकतो. या डब्ब्यांना अनेक जंतू लागलेले असू शकतात. याच प्लेट्समध्ये अन्न पदार्थ खाल्याने अनेक आजार होऊ शकतात. रेल्वेतील हा किळसवाणा प्रकार पाहून प्रवाशांनी संताप व्यक्त केला आहे.

रेल्वेच्या या घाणेरड्या कृत्यामुळे लोकांच्या आरोग्याच्या जीवाशी खेळ होत आहे आहे. ते जे अन्नपदार्थ खातात ते पदार्थ चांगले नसल्याचे समोर आले आहे. नेटकऱ्यांनी हा व्हिडिओ पाहून संताप व्यक्त केला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Pune Crime : पुण्यात 'दृश्यम' स्टाईल' थरार, थंड डोक्याने नवऱ्याने बायकोला संपवलं; हत्याकांडाचा पहिला CCTV समोर

Maharashtra Live News Update : बिबट्यापासून बचावासाठी महिलांची अनोखी शक्कल

दिवाळीत बनवलेली शेव उरले असून मऊ झालेत? पाहा ते पुन्हा कुरकुरीत कशी बनवावे?

भीषण अपघात! विद्यार्थ्यांनी भरलेली स्कूल बस थेट १५० फूट खोल दरीत कोसळली, एकाचा मृत्यू

Blind Restaurant: डोळ्यांनी नाही, संवेदनांनी अनुभवा जेवण; दृष्टिहीनांसारखे जगण्याचा अनुभव देणारा उपक्रम

SCROLL FOR NEXT