फ्लिपकार्टच्या बिग बिलियन डे २०२५ सेलमध्ये आयफोन १६ आणि १६ प्रोच्या ऑर्डर रद्द झाल्याचा मोठा घोटाळा समोर आला आहे.
सोशल मीडियावर #BigBillionScam या हॅशटॅगने मोठा रोष उमटला आहे.
कंपनीने ग्राहकांचे पैसे घेतले, ऑर्डर रद्द केल्याचे सांगत “पेमेंट फेल” म्हटले.
ग्राहकांनी फ्लिपकार्टकडे विश्वास कमी झाल्याचे म्हटले आहे.
फ्लिपकार्टच्या बिग बिलियन डेज २०२५ सेलमधील मोठा घोटाळा उघडकीस आला आहे. ग्राहकांना भारी डिस्काऊंट मिळणार असल्याची जाहिरात करून Apple iPhone 16 आणि iPhone 16 Pro सारखी प्रीमियम मॉडेल्स विक्रीस आणली गेली होती. आकर्षक किंमती पाहून अनेकांनी या ऑफरची प्रतीक्षा केली होती आणि सेल सुरु झाल्यावर मोठ्या संख्येने ऑर्डर्स देखील दिल्या गेल्या. मात्र काही तासांतच फ्लिपकार्टकडून या ऑर्डर्स धडाधड रद्द करण्यात आल्या.
ग्राहकांनी सोशल मीडियावर या प्रकरणाचा जोरदार निषेध केला असून त्यांनी याला “Big Billion Scam” असे नाव देऊन कंपनीच्या धोरणाविरोधात आपली नाराजी व्यक्त केली आहे. फ्लिपकार्ट ब्लॅक आणि प्लस सदस्यांसाठी २२ सप्टेंबरपासून हा सेल सुरु झाला होता. या सेलमध्ये कंपनीने आयफोन १६ चा १२८ जीबी व्हेरिएंट अवघ्या ५१,९९९ रुपयांना आणि आयफोन १६ प्रो बेस ट्रिम ७५,९९९ रुपयांना उपलब्ध होईल अशी जाहिरात केली होती. अशा कमी किंमतीमुळे ग्राहकांनी भराभर ऑर्डर्स केल्या.
तथापि, ऑर्डर बुक झाल्यानंतर लगेचच कंपनीकडून ग्राहकांना ऑर्डर रद्द झाल्याची माहिती देणारे नोटिफिकेशन्स मिळू लागले. अनेक प्रकरणांत ग्राहकांच्या खात्यातून पैसे आधीच डेबिट झाल्याचे दिसून आले, पण त्यानंतर कंपनीकडून "पेमेंट फेल" झाले असल्याचे सांगण्यात आले. या प्रकारामुळे ग्राहक संतप्त झाले असून त्यांनी सोशल मीडियावर फ्लिपकार्टविरोधात रोष व्यक्त करण्यास सुरुवात केली आहे.
ग्राहकांच्या म्हणण्यानुसार या संपूर्ण प्रकारामागे ग्राहकांना आकर्षित करून ट्रॅफिक आणि विक्री वाढविण्याची युक्ती आहे. जुना स्टॉक क्लिअर करण्याच्या नावाखाली कंपनीने मोठ्या प्रमाणावर खोटी जाहिरात करून फसवणूक केल्याचा आरोप होत आहे. आता या घडामोडीनंतर बिग बिलियन डेज सेलच्या विश्वसनीयतेवर मोठा प्रश्नचिन्ह उपस्थित झाला आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.