Mahalaxmi viral video india SAAM TV
व्हायरल न्यूज

Viral Video: कपाळावर कुंकू, डोक्यावर मुकुट...महालक्ष्मीच्या रूपात ३ महिन्यांची चिमुकली; पाहा व्हिडिओ

Mahalaxmi viral video india: महालक्ष्मी देवीच्या साजात सजवलेल्या तीन महिन्यांच्या गोंडस बाळाचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. तिच्या निरागस हसण्याने आणि पारंपरिक रूपाने सर्वांची मने जिंकली आहेत.

Surabhi Jayashree Jagdish

सोशल मीडियावर सध्या एका तीन महिन्यांच्या चिमुकलीचा व्हिडिओ प्रचंड व्हायरल होतोय. या गोंडस बाळाच्या निरागस रूपाने महाराष्ट्रातील युजर्सना भुरळ पडलीये. कोल्हापूरच्या महालक्ष्मी देवीच्या साजात सजवलेल्या या चिमुकलीला पाहून अनेकांनी 'साक्षात महालक्ष्मीच अवतरली' अशी प्रतिक्रिया दिली आहे.

सोशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल

हा व्हिडिओ इंस्टाग्राम आणि फेसबुकसारख्या प्लॅटफॉर्मवर मोठ्या प्रमाणात शेअर होताना दिसतोय. साताऱ्यातील या बाळाला तिच्या आई-वडिलांनी फोटोशूटसाठी स्टुडिओमध्ये नेलं होतं. त्यावेळी तिला पारंपरिक महालक्ष्मीच्या वेशात सजवण्यात आलं.

कपाळावर कुंकू, डोक्यावर मुकुट, आणि पारंपरिक दागिन्यांसह तिचा श्रुंगार करण्यात आला होता. कॅमेऱ्यासमोर तिचं निरागस हसू आणि गोंडस एक्सप्रेशन्स पाहून उपस्थित सर्वजण भारावून गेले होते.

व्हिडिओमध्ये चिमुकलीचे हसरा चेहरा, डोळ्यांतील चमक आणि शांत भाव स्पष्टपणे दिसतात. या निरागसतेमुळेच हा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. अनेक युजर्सने या व्हिडिओवर 'खूपच गोड', 'देवीचं रूप आहे' अशा प्रतिक्रिया नोंदवल्या आहेत. काहींनी तर 'हा व्हिडिओ पुन्हा पुन्हा पाहावासा वाटतो' असंही म्हटलंय.

सोशल मीडियावर अशा प्रकारचे फोटोशूट आणि व्हिडिओ व्हायरल होण्याची ही काही पहिलीच वेळ नाही. मात्र या चिमुकलीच्या निरागसतेमुळे आणि पारंपरिक साजामुळे या व्हिडिओला विशेष प्रतिसाद मिळताना दिसतो.

(डिस्क्लेमर- हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या व्हिडीओमध्ये किती तथ्य आहे याची खातरजमा आम्ही करत नाही.)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: नसरापूर प्रकरणावरुन एकनाथ शिंदे गटाचे आंदोलन

ममतांच्या बंगालमध्ये ९२% विक्रमी मतदान, पण मुद्दे मात्र गायब; नेमकं कोणाचं पारडं जड? वाचा ग्राऊंड रिपोर्ट

8th Pay Commission: आता पगार थेट ₹18,000 वरून ₹69,000? सरकारचा हा निर्णय ठरवणार कर्मचाऱ्यांचे भविष्य

Pune : पुणे पुन्हा हादरले! चाकणमध्ये ३ वर्षाच्या मुलावर अत्याचार; हत्या केल्यानंतर मृतदेह बॅगेत भरला अन्...

Riteish- Raja Shivaji : चित्रपट नव्हे भावना! रितेश देशमुखचा 'राजा शिवाजी' का पाहावा? वाचा ५ यशाची कारणे

SCROLL FOR NEXT