Bihar Crime Saam Tv
viral-satya-news

Snatching Phone: फोन चोरण्यासाठी धावत्या रेल्वेला लटकला तरूण, पाहा काळजात धडकी भरवणारा व्हिडिओ

Bihar Crime: भागलपूरमध्ये एक महिला फोनवर बोलत होती. त्यानंतर एका चोरट्याने मोबाईल हिसकावून पळून जाण्याचा प्रयत्न केला. यावेळी रेल्वेत बसलेल्या प्रवाशांनी चोरट्याला पकडले. चोर चालत्या ट्रेनच्या खिडकीला लटकत राहिला. आता त्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

Thief Attempt To Snatch Phone

सार्वजनिक ठिकाणी, बस किंवा रेल्वेतून प्रवास करताना अनेकदा प्रवाशांना त्यांचं सामान सुरक्षित ठेवण्यास सांगितलं जातं. सार्वजनिक ठिकाणी चोरीच्या घटना घडतात. असाच एक व्हिडिओ सोशल मिडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झालाय. ज्यामध्ये एका मोबाईल चोराला लोकांनी रंगेहाथ पकडलं (Snatching Phone in Railway) आहे. चोरी केल्यानंतर त्याने पळून जाण्याचा प्रयत्न केला. पण पळताना त्यानं रेल्वेच्या खिडकीला पकडलं. लोकांनी या चोराला पकडलं, त्याला मारहाण देखील केलीय. (latest marathi news)

ही घटना बिहारच्या भागलपूर रेल्वेमध्ये घडली आहे. प्रवासी महिला फोनवर बोलत होती. चोरट्याची या महिलेच्या मोबाईलवर नजर होते. त्याने या महिलेशी झटापट केली. झटापटीत चोरट्याने मोबाईल हिसकावून पळून जाण्याचा प्रयत्न केला. यावेळी रेल्वेत बसलेल्या प्रवाशांनी चोरट्याला पकडले. त्याने धावत्या रेल्वेतून पळून जाण्याचा प्रयत्न केला. पण, त्याला इतर प्रवाशांनी रेल्वेच्या दुसऱ्या खिडकीतून पकडले. पकडलेल्या चोराचे दोन्ही हात रेल्वेच्या आत ओढले. चोर रेल्वेबाहेर लटकत राहिला. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल

रेल्वेमध्ये प्रवास करणाऱ्या काही प्रवाशांनी हे दृश्य आपल्या फोनच्या कॅमेऱ्यात कैद केलं. आता हा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल (bihar crime news) होतोय. रेल्वे भरधाव वेगाने धावत होती. तो चोर पकडलेल्या लोकांना माझे हात सोडू नका, अन्यथा मी मरेल, अशी विनंती करत होता. त्यानंतर प्रवाशांनी चोरट्याला आपत्कालीन खिडकीतून आत ओढून बेदम मारहाण केली.

खरं तर अशा घटनांमुळेच आपले सामान, दागिने, पैसे आणि मौल्यवान वस्तू सांभाळून ठेवा. आपल्या सामानाची काळजी घ्या, असं सार्वजनिक ठिकाणी सांगितलं (railway) जातं.

याआधीही असाच प्रकार

बेगुसराय येथूनही असंच एक प्रकरण समोर आलं होतं. सोनपूर-कटिहार रेल्वे सेक्शन दरम्यान सत्यम कुमार नावाच्या रेल्वे प्रवाशाचा मोबाईल चोरून दोन चोरटे पळून गेले होते. एक चोरटा पळून जाण्यात यशस्वी झाला. पण, दुसऱ्या चोराला रेल्वेच्या खिडकीतून प्रवाशांनी पकडले. इतक्यात ट्रेन सुरू (Snatching Phone) झाली.

धावत्या रेल्वेमधून मोबाईल चोरणाऱ्या व्यक्तीला अनेक किलोमीटर दूर खिडकीला लटकवून ठेवले (bihar crime) होते. व्हिडिओमध्ये रेल्वेला लटकलेला व्यक्ती स्थानिक भाषेत म्हणत होता, भाई तुझा हात सोडू नकोस, हात तुटेल आणि मी मरेल.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

रशियाच्या हल्ल्याने युक्रेन हादरलं, ट्रम्पसोबत चर्चेनंतर रशियाचा हल्ला; युक्रेनची राजधानी रशियाकडून उध्वस्त?

IND vs ENG Test 2 Day 3: All Out! सिराजच्या भेदक माऱ्यापुढे इंग्लंडची टीम ढेपाळली; भारताकडे 180 धावांची आघाडी

Sushil Kedia : आमच्यासारखा जर खरंच पेटून उठला तर...व्यावसायिक सुशील केडिया यांनी राज ठाकरेंना डिवचलं

ठाकरेंच्या मेळाव्याला काँग्रेस-राष्ट्रवादीची दांडी? ठाकरेंच्या मेळाव्यात मविआचा सहभाग? मराठीवरून मविआत फूट?

Maharashtra Politics : मुंबईत होणार मराठीची एकजूट; ठाकरेंची युती, महायुतीला धडकी? Video

SCROLL FOR NEXT