Pimpari Chinchwad Crime: विमानाने जायचे अन् वाहन चोरी करायचे, पोलिसांनी १० जणांना ठोकल्या बेड्या; टोळीत पोलीस कर्मचाऱ्याचाही सहभाग

Crime News: परराज्यात विमान प्रवासाने जाऊन चारचाकी वाहन चोरी करणाऱ्या टोळीच्या मुसक्या आवळण्यात पिंपरी चिंचवड पोलिसांना यश आले आहे. पिंपरी चिंचवड पोलिसांच्या दरोडा विरोधी पथकाने ही मोठी कारवाई केली आहे
Pimpari Chinchwad Crime
Pimpari Chinchwad CrimeSaamtv
Published On

Pimpari Chinchwad Crime News:

परराज्यात विमान प्रवासाने जाऊन चारचाकी वाहन चोरी करणाऱ्या टोळीच्या मुसक्या आवळण्यात पिंपरी चिंचवड पोलिसांना यश आले आहे. पिंपरी चिंचवड पोलिसांच्या दरोडा विरोधी पथकाने ही मोठी कारवाई केली आहे. यामध्ये जवळपास 1 कोटी ५७ लाख रुपये किमतीची 11 चार चाकी वाहन जप्त करण्यात आली आहेत. (Crime News in Marathi)

याबाबत सविस्तर माहिती अशी की, पिंपरी चिंचवड (Pimpari Chinchwad) पोलिसांच्या दरोडाविरोधी कार चोरी करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश केला आहे. धक्कादायक बाब म्हणजे कार चोरणाऱ्या टोळीमध्ये एका पोलीस कर्मचाऱ्याही समावेश असल्याचे उघड झाले आहे. भरत खोडकर असे या कर्मचाऱ्याचे नाव असून तो पोलीस दलात पोलीस शिपाई पदावर कार्यरत आहे.

तर अजीम सलीम पठाण हा या कार चोरी करणाऱ्या टोळीचा मोरक्या आहे. अजीम पठाण हा विमान प्रवासाने दिल्ली,मध्यप्रदेश या राज्यात जाऊन काही सहकारांच्या मदतीने चार चाकी वाहन चोरी करायचा. चोरी केलेली चार चाकी वाहन तो महाराष्ट्रात आणून कमी किमतीत काही लोकांना विकत असल्याचे पोलीस तपासात निष्पन्न झाले आहे.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

Pimpari Chinchwad Crime
Chhagan Bhujbal News: भुजबळ कुटुंब अडचणीत? नाशिक जिल्हा बँकेने बजावली नोटीस, काय आहे प्रकरण?

या प्रकरणात पोलिसांनी अजीम सलीम पठाण, शशिकांत प्रताप काकडे, राजाराम उर्फ राजू तुकाराम खेडेकर, महेश भीमाशंकर सासवे, प्रशांत माने, विकास माने, भारत खोडकर, हाफिज, इलियास आणि रसूल शेख या दहा आरोपींना दरोडा विरोधी पोलीस पथकाने बेड्या ठोकल्या आहेत. (Latest Marathi News)

Pimpari Chinchwad Crime
Ayodhya Ram Mandir Invitation: सचिन तेंडुलकरला मिळालं राम मंदिर प्रतिष्ठापणेचं निमंत्रण, कधी जाणार अयोध्येला?

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com