Chhagan Bhujbal News: भुजबळ कुटुंब अडचणीत? नाशिक जिल्हा बँकेने बजावली नोटीस, काय आहे प्रकरण?

Chhagan Bhujbal Latest News In Marathi: भुजबळ कुटुंब पुन्हा एकदा चर्चेत आलं आहे. माजी खासदार समीर भुजबळ आणि माजी आमदार पंकज भुजबळ यांना बँकेने नोटीस बजावली आली आहे. काय आहे प्रकरण, जाणून घ्या.
Chhagan Bhujbal News
Chhagan Bhujbal NewsSaam tv
Published On

Chhagan Bhujbal News:

भुजबळ कुटुंब पुन्हा एकदा चर्चेत आलं आहे. माजी खासदार समीर भुजबळ आणि माजी आमदार पंकज भुजबळ यांना बँकेने नोटीस बजावली आली आहे. बँकेने कर्ज थकवल्या प्रकरणी ही नोटीस बजावली आहे. (Latest Marathi News)

बँकेचे कर्ज थकवल्या प्रकरणी नाशिक जिल्हा बँकेने माजी खासदार समीर भुजबळ आणि माजी आमदार पंकज भुजबळ यांना नोटीस बजावली आहे. भुजबळ कुटुंबीयांच्या मालकी असलेल्या मालेगावच्या दाभाडी येथील आर्मस्ट्राँग साखर कारखान्यावर असलेल्या थकीत 51 कोटी 66 लाख थकीत कर्ज वसुलीसाठी बँकेकडून नोटीस बजावण्यात आली आहे. बँकेच्या अधिकाऱ्यांनी दाभाडी येथे जाऊन आर्म स्ट्रॉंगच्या गेटवर चिटकवली नोटीस आहे. (साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

Chhagan Bhujbal News
Kalaram Mandir: उद्धव ठाकरेंनी अयोध्येला न जाता काळाराम मंदिरातच जाण्याचा निर्णय का घेतला?

छगन भुजबळ काय म्हणाले?

बँकेच्या नोटीसवर प्रतिक्रिया देताना छगन भुजबळ म्हणाले, 'आम्ही १२ कोटी रुपये आर्मस्ट्राँग काखान्यावर कर्ज घेतलं होतं. ईडीने हा कारखाना अटॅच केला आहे. बँकेने तो कारखाना कधीही लिलाव केला तर यापेक्षा त्यांना जास्त पैसे मिळतील. कायदा कायदा आहे, छगन भुजबळ काही कायद्याच्या पुढे मोठा नाही. त्यामुळे बँकेकडून कर्ज घेतलं असेल तर नोटीस जाणारच'.

छगन भुजबळ बीड दौऱ्यावर

मंत्री छगन भुजबळ बीड शहराच्या दौऱ्यावर आहेत. समता परिषदेचे सक्रिय कार्यकर्ते मयत मनोज भानोसे यांच्या घरी मंत्री भुजबळांनी सांत्वनपर भेट दिली. मनोज भानोसे यांचे 2 दिवसांपूर्वी हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले होते. भानुसे कुटुंबीयांचे सांत्वन करण्यासाठी मयत मनोज भानोसे यांच्या घरी भुजबळांनी भेट दिली.

Chhagan Bhujbal News
Sharad Pawar News: 'लोकसभा निवडणुका डोळ्यासमोर ठेवून राममंदिर उद्घाटन...' शरद पवारांचे टीकास्त्र

भुजबळांच्या सुरक्षेसाठी पोलिसांचा फौजफाटा

तत्पूर्वी, मंत्री छगन भुजबळ बीडच्या शासकीय विश्रामगृहावर पोहोचले. त्यानंतर भुजबळांच्या सुरक्षेसाठी पोलिसांचा फौजफाटा वाढविण्यात आला. यामुळे छावणीचे स्वरूप शासकीय विश्रामग्रहाला आले होते. बीड शहरातील जाळपोळ आणि आज होणाऱ्या भुजबळ यांच्या भाषणाच्या पार्श्वभूमीवर बंदोबस्त वाढविला आहे. परिसरात कोणताही अनुचित प्रकार होऊ नये म्हणून मोठा बंदोबस्त वाढविण्यात आला आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com