Sharad Pawar News: 'लोकसभा निवडणुका डोळ्यासमोर ठेवून राममंदिर उद्घाटन...' शरद पवारांचे टीकास्त्र

SharadPawar on India Aaghadi Meeting: आज देशाला पर्याय देण्यासाठी विविध राजकीय पक्ष सत्ताधा-यांच्या विरोध एकत्र येत आहेत, हिच इंडिया आघाडीची जमेची बाजू आहे, असे शरद पवार यावेळी म्हणाले.
Sharad Pawar
Sharad Pawar saam tv
Published On

Sharad Pawar Press Conference:

इंडिया आघाडीची आज व्हर्च्युअल बैठक झाली आहे. या बैठकीत काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांची इंडिया आघाडीच्या अध्यक्षपदी निवड करण्याचा प्रस्ताव मांडण्यात आला, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. इंडिया आघाडीच्या बैठकीनंतर शरद पवार यांनी पत्रकार परिषद घेत पुढील भूमिका स्पष्ट केली.

काय म्हणाले शरद पवार?

"अनेक राज्याचे मुख्यमंत्री आणि महत्वाचे नेते आजच्या इंडिया आघाडीच्या (India Aaghadi) बैठकीत सहभागी झाले. बैठकीत एकविचाराने निवडणूकीला सामोरे जाणाचा विचार झाला. तसेच जागा वाटपावरुन काही वाद आहेत ते मिटवले जावे याबाबत चर्चा झाली असुन इंडिया आघाडीचे नेतृत्व खरगेंनी घ्यावं," अशा सुचना काही सहकाऱ्यांनी केल्याचे शरद पवार म्हणाले.

"आज देशाला पर्याय देण्यासाठी विविध राजकीय पक्ष सत्ताधा-यांच्या विरोध एकत्र येत आहेत, हिच इंडिया आघाडीची जमेची बाजू आहे. इंडिया आघाडीत नाराजी नसून संयोजक पदाची जबाबदारी नितिश कुमारांनी घ्यावी अशी सुचना केली, मात्र संयोजकाची गरज नसल्याचेमत नितिष कुमारांनी मांडल्याचेही शरद पवार म्हणाले.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

Sharad Pawar
India Alliance च्या अध्यक्षपदी खरगे? नितीश कुमार संयोजकपदी, आजच्या बैठकीत काय झाली चर्चा?

"आम्ही कोणालातरी प्रोजेक्ट करुन त्याच्या नावाने मत मागावी अशी गरज वाटत नाही. आम्हाला विश्वास आहे देशाला पर्याय देऊ शकतो," असेही शरद पवार म्हणाले. तसेच १९७७ सालचे उदाहरण देत मोराची देसाईचे उदाहरण देत इंडिया आघाडीचा चेहरा नसावा असेही मत शरद पवार यांनी मांडले. (Latest Marathi News)

आम्ही सर्वजण आयोद्धेला जात नाही पण तसं नाही म्हणून राष्ट्रवादीसह कॉंग्रेसवर टिका केली जाते. राम मंदिराचे काम अर्धवट आहे ती कामे पुर्ण करा. लोकसभा निवडणुका डोळ्यासमोर ठेवुन उद्घाटन होत आहे कुणाचाही राम मंदिराला विरोध नाही, असा टोलाही शरद पवार यांनी लगावला.

Sharad Pawar
Maharashtra Politics: उद्धव ठाकरे ७ जन्मही फडणवीसांची बरोबरी करू शकत नाहीत, बावनकुळेंचा घणाघात

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com