देवेंद्र फडणवीस उद्धव ठाकरे यांना कधी कळलेच नाहीत. माझा त्यांचा ३५ वर्षांचा संबंध आहे. उद्धव ठाकरे फोटोग्राफी करायचे तेव्हा देवेंद्र फडणवीस कारसेवक होते. त्यामुळे सात जन्म उद्धव ठाकरे फडणवीसांची बरोबरी करू शकत नाहीत, असा टोला भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी उद्धव ठाकरे यांना लगावला आहे.
उद्धव ठाकरे यांनी कालची चित्रफीत नीट पाहिली नाही. अटल सेतूचं लोकार्पण करताना सर्वत्र बॅनरवर जाहिरातीत अटलजींचा फोटो होता. मी नेहमीच म्हणतो उद्धव ठाकरे मीडियासमोर येऊन नॅरेटीव्ह सेट करतात. मात्र नरेंद्र मोदी जगातील सर्वोत्तम नेता असं जग म्हणतं, मात्र पाक आणि उद्धव ठाकरे तेवढे राहिले आहेत, मोदींना महान म्हणायचं.नरेंद्र मोदी किती घरंदाज होते हे २०२४ ला दिसेलच. उरणमध्ये ९० हजार महिला मोदींना नमस्कार करायला आल्या होत्या. मोदीजीच्या वादळात महाविकास आघाडी झाडपत्यांसारखी उडून जाईल.
काळाराम मंदिरात पूजा करण्याचा त्यांचा अधिकार आहे. बाळासाहेब ठाकरे यांच्या स्वप्नपूर्तींचा २२ जानेवारी दिवस आहे. बाळासाहेब वरून बघत असतील माझा उद्धव अयोध्येत का जात नाही. कशाची एलर्जी आहे आहे, माझ्या उद्धवला असं ते बोलतील. स्टॅलीनचा मुलगा म्हणाला होता की हिंदू धर्म संपवू. अशा लोकांसोबत उद्धव ठाकरे राहतात. महाविकास आघाडीत उद्धव ठाकरे यांना दोन जागा मिळाल्या तरी ते आघाडीत राहतील. ते मजबूर आहेत.येत्या काळात शरद पवार गट आणि उद्धव जी यांच्या पक्षाची वाईट स्थिती होईल. त्यांना उमेदवारंही मिळणार नाही. युतीच्या जागावाटपाबाबतचा निर्णय केंद्रीय पार्लीमेंट्री बोर्ड ठरवेल. जी जागा ज्याला मिळेल ती आम्ही निवडून आणण्याचा दावा त्यांनी केला.
('साम टीव्ही'चं व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)
ठेवी विकासासाठी खर्च करायला हवी, सरकार डिपॅाझीट करण्यासाठी नाही. जनतेच्या हितासाठी खर्च करणे ही सरकारची जबाबदारी आहे. अटल सेतुमुळे इंधनाची मोठी बचत होणार आणि पर्यावरण हितासाठी ही चांगली बाब आहे.
राम मंदिराचं मला निमंत्रण आलेलं नाही. मात्र सध्या राज्यभर कार्यक्रम आहेत. त्यानंतर अयोध्येला जाणारंच. उद्धव ठाकरे यांनी मात्र निमंत्रण देण्यात आलं आहे. त्यांनी जायला हवं. त्यांची काय भावना आहे हे माहीत नाही. पण देशाची भावना आहे, देशातील बच्चा बच्चा म्हणतोय. मोदींच्या हस्ते राम मंदिराची प्राणप्रतिष्ठा होतेय.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.