सचिन जाधव, पुणे|ता. १३ जानेवारी २०२४
आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या (मनसे) राज्यभरातील सरपंच आणि ग्रामपंचायत सदस्यांचा राज्यस्तरीय मेळावा आज पुण्यात (शनिवारी, १३ जानेवारी) पार पडत आहे. या मेळाव्यात मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी युवा सरपंचांना मार्गदर्शन केले. तसेच २२ जानेवारीच्या राम मंदिर उद्घाटन सोहळ्यावरुनही राज ठाकरेंनी मन सैनिकांना महत्वाचे आवाहनही केले.
काय म्हणालेत राज ठाकरे?
"तुम्ही ज्या भागात राहता त्या ठिकाणी काय केलं पाहिजे काय नाही केले पाहीजे हे तुम्हाला कळंत. निधी वापर कसा करायचा तो आणायचा कसा हे सगळं तुम्हाला माहिती आहे. आज पहिला टप्पा पार केला पुढे आमदार खासदार व्हाल पण आता स्वप्न बघू नका..." अशी मिश्कील टिप्पणी मनसे अध्यक्षांनी (Raj Thackeray) यावेळी केली.
युवा सरपंचांना दिला स्वच्छतेचा संदेश...
"मला एकच सूचना करायची आहे गाव स्वच्छ ठेवा. आपल्या आजूबाजूचा परिसर स्वच्छ ठेवण्यासाठी पैसे लागत नाहीत, इच्छाशक्ती लागते, असे म्हणत ग्रामपंचायत स्वच्छ ठेवण्याचे आवाहन त्यांनी मनसैनिकांना केले. तसेच ज्या मनसे सरपंचाची सर्वात स्वच्छ ग्रामपंचायत असेल त्याला ५ लाखाचा निधी मी स्वतः येऊन देईन," अशी मोठी घोषणाही त्यांनी यावेळी केली.
('साम टीव्ही'चं व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)
राम मंदिर उद्घाटनावरुन महत्वाचे विधान...
दरम्यान, यावेळी बोलताना मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी २२ जानेवारीला होणाऱ्या राम मंदिर उद्घाटनावरुन मनसैनिकांना महत्वाचे आवाहन केले. "२२ जानेवारीला राममंदिर होत आहे, बाकी भानगडीत पडू नका. इतकेच सांगेन की कार सेवकांनी पाहिलेलं स्वप्न पूर्ण होत आहे. तेव्हा मनसेच्या सैनिकांनी कार सेवकांच्या आनंदात सहभागी व्हायचे आहे. जिथे जिथे शक्य आहेत तिथे आरत्या किंवा विविध स्वरूपाचे कार्यक्रम इतरांना त्रास होणार नाही अशा पद्धतीने साजरे करा.." असे राज ठाकरे म्हणाले. (Latest Marathi News)
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.