Kalyan Crime: क्लिनअप मार्शल असल्याचे सांगत नागरिकांना लुटले, कल्याणमधील धक्कादायक प्रकार; दोघांना अटक

Kalyan Breaking News: क्लीनअप मार्शल असल्याचे सांगत रस्त्यावर थुंकणाऱ्या डिजिटल वॉचच्या सप्लायरला लुटणाऱ्या दोघांना कल्याण महात्मा फुले पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत.
Kalyan Crime News
Kalyan Crime NewsSaamtv
Published On

अभिजीत देशमुख, कल्याण|ता. १२ जानेवारी २०२४

Kalyan Crime News:

क्लीनअप मार्शल असल्याचे सांगत रस्त्यावर थुंकणाऱ्या डिजिटल वॉचच्या सप्लायरला लुटणाऱ्या दोघांना कल्याण महात्मा फुले पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. संकेत उतकेर आणि अमित कुळे अशी अटक केलेल्यांची नाव आहेत. या दोघांनी अशा प्रकारे आणखी काही नागरिकांना लुटल्याचा संशय पोलिसांना असून याप्रकरणी महात्मा फुले पोलीस पुढील तपास करत आहेत. (Crime News in Marathi)

याबाबत सविस्तर माहिती अशी की, कल्याण (Kalyan) वालधुनी परिसरात विल्सन दोरा स्वामी हे डिजिटल वॉचच्या सप्लायर पायी चालत असताना दुचाकीवर आलेल्या दोन इसमानी त्यांना अडवले. या दोघांनी आम्ही महापालिकेचे क्लीन अप मार्शल असून तुम्ही रस्त्यावर थुंकलात तुम्हाला दंड भरावा लागेल असे सांगितले.

काही क्षणातच या दोघांनी दोरास्वामी यांची डिजिटल वॉच व रोकड असलेली बॅग हिसकावून बॅग तपासली. बॅग घेऊन त्यांनी आमचे साहेब समोर उभे आहेत त्यांना भेटून घ्या असं सांगत या दोन्ही अज्ञातांनी काही समजायच्या आतचं त्या ठिकाणाहून धूम ठोकली.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

Kalyan Crime News
Ahmednagar News: नगरकरांसाठी अभिनव स्पर्धा! खासदार सुजय विखे थेट विमानाने घडवणार अयोध्येतील रामदर्शन; वाचा सविस्तर...

दरम्यान, आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच या प्रकरणी दोरास्वामी यांनी महात्मा फुले पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली. महात्मा फुले पोलिसांनी तांत्रिक तपास करत संकेत उतकेर आणि अमित कुळे या दोघा भामट्यांना बेड्या ठोकल्या आहेत. पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत. (Latest Marathi News)

Kalyan Crime News
CCTV Video: शताब्दी रुग्णालयामधून २० दिवसांच्या बाळाची चोरी; खळबळजनक घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com