Director Death: चित्रपटसृष्टीतील आणखी एक तारा हरपला; प्रसिद्ध दिग्दर्शकाचे अकाली निधन, चित्रपटसृष्टीला मोठा धक्का

Director Death: तुळू चित्रपट दिग्दर्शक सूरज बोलार यांचे बंगळुरूमध्ये निधन झाले. पट्टीस गँग आणि राहुकाला गुलिगकाला चित्रपटांमुळे त्यांना ओळख मिळाली होती. त्यांच्या निधनाने मनोरंजन क्षेत्रात शोककळा पसरली आहे.
Famous Tulu filmmaker Director Sooraj Bolar passes away
Famous Tulu filmmaker Director Sooraj Bolar passes awaySaam Tv
Published On: 

Director Death: मनोरंजन विश्वातून एक दुःखद बातमी समोर आली आहे. तुळू चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध दिग्दर्शक, अभिनेते आणि लेखक सूरज बोलार यांचे निधन झाले आहे. त्यांनी वयाच्या ५० व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला. २२ नोव्हेंबर रोजी बंगळुरू येथे त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांच्या निधनामुळे तुळू चित्रपटसृष्टीसह दक्षिण भारतातील मनोरंजन क्षेत्रात शोककळा पसरली आहे. सूरज बोलार यांनी आपल्या कारकिर्दीत 'पट्टीस गँग' आणि 'राहुकाला गुलिगकाला' यांसारख्या चित्रपटांचे दिग्दर्शन केले होते. त्यांच्या अचानक जाण्याने कुटुंबीय, मित्रपरिवार आणि चाहत्यांना मोठा धक्का बसला आहे.

सूरज बोलार यांच्या निधनाने चित्रपटसृष्टीत शोककळा

टाइम्स ऑफ इंडियाच्या वृत्तानुसार, सूरज बोलार यांचे निधन २२ नोव्हेंबर रोजी बंगळुरू येथे झाले. ते दिवंगत आनंद बोलार यांचे पुत्र होते. सूरज यांनी केवळ चित्रपट दिग्दर्शक म्हणूनच नव्हे, तर अभिनेता आणि लेखक म्हणूनही आपली ओळख निर्माण केली होती. विविध क्षेत्रांमध्ये काम करत त्यांनी मनोरंजन विश्वात स्वतःचा ठसा उमटवला होता.

Famous Tulu filmmaker Director Sooraj Bolar passes away
Gun Master G9 Review: इम्रान हाश्मीचा 'गन मास्टर जी९' थिएटरमध्ये पास की फेल? प्रेक्षकांनी सांगितला कसा वाटला सिनेमा

'पट्टीस गँग'मधून मिळाली विशेष ओळख

सूरज बोलार यांच्या गाजलेल्या चित्रपटांपैकी एक म्हणजे 'पट्टीस गँग'. २०१८ मध्ये प्रदर्शित झालेल्या या तुळू भाषेतील कॉमेडी-थ्रिलर चित्रपटाचे लेखन आणि दिग्दर्शन त्यांनी केले होते. या चित्रपटात तीन व्यक्ती बनावट व्यवसायांच्या माध्यमातून लोकांची फसवणूक करत असल्याची कथा दाखवण्यात आली होती. मात्र, एका महिलेच्या संपर्कात आल्यानंतर त्यांच्या आयुष्यात वेगवेगळ्या घडामोडी घडतात. विनोद, गुन्हेगारी आणि सस्पेन्स यांचा मिलाफ या चित्रपटात पाहायला मिळाला होता.

Famous Tulu filmmaker Director Sooraj Bolar passes away
Eetha movie: श्रद्धा कपूरच्या 'ईठा' चित्रपटाने प्रदर्शनापूर्वीच रचला इतिहास; 'जी जी रे जी' गाण्याची आशिया बुक ऑफ रेकॉर्ड्समध्ये नोंद

'राहुकाला गुलिगकाला'चेही केले होते दिग्दर्शन

'पट्टीस गँग' व्यतिरिक्त सूरज यांनी 'राहुकाला गुलिगकाला' या तुळू थ्रिलर चित्रपटाचेही दिग्दर्शन केले होते. या चित्रपटात अर्जुन कापिकाड, नव्यता राय, अरविंद बोलार, विस्मया विनायक आणि चंद्रहास उल्लाल यांसारखे कलाकार महत्त्वाच्या भूमिकांमध्ये होते. तुळू चित्रपटसृष्टीत वेगवेगळ्या विषयांवर काम करत त्यांनी आपली वेगळी ओळख निर्माण केली होती.

२३ नोव्हेंबर रोजी झाले अंत्यदर्शन

सूरज बोलार यांच्या निधनानंतर २३ नोव्हेंबर रोजी बंगळुरूमधील अंद्राहल्ली मेन रोड येथील त्यांच्या निवासस्थानी अंत्यदर्शनाची व्यवस्था करण्यात आली होती. सकाळी १० ते ११ या वेळेत कुटुंबीय, मित्र आणि चाहत्यांना त्यांचे अंतिम दर्शन घेता आले. त्यानंतर बंगळुरूमधील सुमनहळ्ळी स्मशानभूमीत त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले. सूरज बोलार यांच्या निधनाने तुळू मनोरंजन क्षेत्रातील एका बहुगुणी कलाकाराला गमावल्याची भावना व्यक्त केली जात आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.