Wardha Crime News: पत्नीने दिली दुचाकी चोरीला गेल्याची तक्रार, पतीच निघाला चोर, नक्की काय होता पतीचा प्लान?

Wardha Crime News: दुसऱ्या व्यक्तीची आणलेली दुचाकी बाजारातून चक्क पतीनेच चोरल्याचा धक्कादायक प्रकार वर्धा जिह्यातील पवनार येथे घडला आहे. साथीदाराच्या मदतीने चोरी केलीली दुचाकी विकून आलेले पैसे वाटून घेण्याचा पतीचा प्लान होता.
Wardha Crime News
Wardha Crime NewsSaam Digital
Published On

Wardha Crime News

दुसऱ्या व्यक्तीची आणलेली दुचाकी बाजारातून चक्क पतीनेच चोरल्याचा धक्कादायक प्रकार वर्धा जिह्यातील पवनार येथे घडला आहे. साथीदाराच्या मदतीने चोरी केलीली दुचाकी विकून आलेले पैसे वाटून घेण्याचा पतीचा प्लान होता. पोलिसांनी या दोघांना अटक केली असून त्याच्याकडून दुचाकी जप्त केली आहे. रवी उर्फ रविंद्र पांडे आणि दशरथ कुराडे अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, क्रारदार महिला दुर्गा रविंद्र पांडे (रा. स्वागत कॉलनी) या प्रफुल्ल शेंडे यांच्या मालकीच्या दुचाकीने पतीसोबत बाजार आणण्यासाठी आणि देवदर्शनासाठी गेल्या होत्या. मात्र बाजार घेऊन परतल्यानंतर ज्या ठिकाणी दुचाकी पार्किंग केली होती, त्या ठिकाणी दिसून आली नाही. दुचाकी चोरीला गेल्याचा संशय बळावला. एकतर दुसऱ्याची दुचाकी तीही चोरीला गेली त्यामुळे त्यांनी तातडीने सेवाग्राम पोलिसात धाव घेतली आणि तक्रार दाखल केली.

Wardha Crime News
Pune Ruby Hospital: रुबी हॉस्पिटलमधील महिला कामगार आत्महत्या प्रकरणी मोठी अपडेट; मॅनेजरसह दोघांवर गुन्हा दाखल

त्यानंतर पोलिसांनी तपास सुरू केला असता ही दुचाकी दशरथ कुराडे (रा. वडार झोपडपट्टी, आर्वीनाका) याने चोरल्याची माहिती मिळाली. पोलिसांनी त्याला ताब्यात घेऊन विचारपूस केली असता त्याने गुन्ह्याची कबुली दिली. रविंद्र पांडे यांनेच दुचाकीची दुसरी चावी देऊन दुचाकी चोरायला सांगितल्याची माहिती त्याने दिली. ही दुचाकी फायनांन्सवर असल्याने ती विकून पैसे वाटून घेऊ असेही त्याने सांगितल्याची कबुली दिली. त्यामुळे पोलिसांनी दशरथ कुराडेसह रवी उर्फ रविंद्र पांडे याला अटक केली.

Wardha Crime News
Crime News: 'खून का बदला खून' म्हणत काढला काटा... 'कानून के हाथ लंबे हाेते है' पाेलीसांनी दाखवून दिले; वाचा रहस्यमयरित्या खूनाचा उलगडा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com