Fake gold biscuits  Saam Tv News
viral-satya-news

सोन्याची बोगस बिस्किटं बाजारात? तुम्ही खरेदी केलेलं सोनं बोगस तर नाही ना? व्हायरल व्हिडिओमागचं सत्य काय?

Fake Gold Biscuits : ⁠ही बनावट गिरी किंवा डुप्लिकेशन सामान्य ग्राहक ओळखू शकत नाही. त्यातच फायदा घेऊन अशा वस्तू विकल्या गेल्याचं दिसतंय.

Prashant Patil

मुंबई : तुमच्याकडे असलेलं सोनं बोगस तर नाही ना.? हा प्रश्न आम्ही का विचारतोय हा रिपोर्ट पाहिल्यानंतर तुम्हाला कळेल. कारण, बोगस सोन्याची विक्री केली जातेय असा दावा व्हिडिओतून करण्यात आलाय. त्यामुळे आम्ही या दाव्याची पडताळणी केली...त्यावेळी काय सत्य समोर आलं पाहूयात. तुम्ही सोनं खरेदी करत असाल तर हा व्हिडिओ पाहून तुम्हाला नक्कीच धक्का बसला असेल. कारण, तुम्ही घेत असलेलं सोन्याचं बिस्किट बोगस असू शकतं असा या व्हिडिओत दावा करण्यात आलाय.

सोनं अनेकजण खरेदी करतात. महिलांना तर सोनं हा आवडीचा विषय काहीजण त्याचे दागिने बनवतात. तर काही लोक गुंतवणूक म्हणून सोन्याची बिस्किटं खरेदी करतात, आणि ही सोन्याची बिस्किटं ऑनलाईनही उपलब्ध आहेत. कधी कधी ही सोन्याची बिस्किटं बाजारभावापेक्षाही कमी किंमतीत विकली जातात. मात्र, हे सोनं खरंच शुद्ध असतं का? की पैसे कमावण्यासाठी व्यापारी लोकांना गंडा घालतायत? याची सत्यता जाणून घेणं गरजेचं आहे.

⁠ही बनावट गिरी किंवा डुप्लिकेशन सामान्य ग्राहक ओळखू शकत नाही. त्यातच फायदा घेऊन अशा वस्तू विकल्या गेल्याचं दिसतंय. मात्र, ब्रांडेड सराफ व्यावसायिक किंवा कंपन्यांकडून अशी फसवणूक होणार नाही - ⁠सराफ बाजारामध्ये असे प्रकार सध्या सुरू आहेत. सोनं सर्वकाळ महागच राहिलेला आहे. त्यामुळे सोन्याच्या बाबतीत असे प्रकार आधीपासून होत आहेत. ⁠फक्त बिस्किटाच्या बाबतीत असे प्रकार होत नाही तर दागिन्यांच्या बाबतीत देखील असे फसवणुकीचे प्रकार होतात. सोन्याच्या बिस्कीटातूनच नव्हे तर दागिन्यातूनही फसवणूक होऊ शकते. असं तज्ज्ञांचं मत आहे, त्यामुळे ही फसवणूक टाळायची असेल तर शुद्ध सोनं कसं ओळखायचं पाहुयात.

कसं ओळखाल शुद्ध सोनं?

डुप्लिकेट वेबसाईटवरून ग्राहकांची फसवणूक होऊ शकते

⁠⁠फसवणूक टाळायला ओळखीच्या ज्वेलर्सकडून सोनं घ्यावं

ग्राहकांनी दागिन्यांवर हॉलमार्क तपासून घ्यावे

हॉलमार्कवरती एचयू आयडी नंबर क्रॉस चेक करावे

कॅरेटोमीटरने सोन्याची शुद्धता चाचणी करावी

कमी किमतीत सोनं मिळतंय म्हणून लालचेला बळी पडू नये असा सल्ला ज्वेलर्सकडून देण्यात आलाय. सगळेच व्यापारी सोनं हे बोगस विकतात असं नाही. मात्र, काही लोक पैशांसाठी ग्राहकांना बोगस सोनं देऊन फसवणूक करत असल्याचं दावा आमच्या पडताळणीत सत्य ठरलाय.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Pune News : आजारी आजीला तरुणाने पाठीवर बसवून रुग्णालयात नेलं, ५ किमीपर्यंत पायपीट; पुणे जिल्ह्यातलं भयंकर वास्तव

Heart Disease: धक्कादायक! भारतातील ४ पैकी एका व्‍यक्‍तीला अनुवांशिक घटकांच्या जोखीमेमुळे हृदयाच्या आजारांचा धोका

Maharashtra Live News Update: केळी पीक विम्याच्या लाभातील प्रशासकीय अडथळा अखेर दूर

Box Office: 'जॉली एलएलबी ३' आणि दशावतारमध्ये काटे की टक्कर; कोणी मारली बाजी तिकिट खिडकीवर बाजी?

भय इथले संपले नाही! सोलापूर अन् धाराशिवमध्ये पावसाचा जोर कायम; पुढील २४ तास धोक्याचे

SCROLL FOR NEXT