हलाल सर्टिफिकेटचं जिहादी कनेक्शन? हलाल सर्टिफिकेटची किंमत किती? नेमकं प्रकरण काय?

Jihadi Connection of Halal Certificate : आंतरराष्ट्रीय पातळीवर हलाल सर्टिफाईड उत्पादनांची उलाढाल तब्बल 5 ट्रिलियन अमेरिकी डॉलर इतकी आहे. त्यामुळे अनेक कंपन्या हलाल सर्टिफिकेट करुन घेतात.
Jihadi Connection of Halal Certificate
Jihadi Connection of Halal CertificateSaam Tv News
Published On

मुंबई : मुस्लिमांचं हलाल विरुद्ध हिंदूंच्या मल्हारचा झटका हा वाद उफाळून आलाय. त्यातच बेकायदेशीर हलाल सर्टिफिकेटचं जिहादी कनेक्शन असल्याचा आरोप करण्यात आलाय. मात्र हा आरोप कुणी केलाय? आणि हलाल सर्टिफिकेट मिळवण्यासाठी मोजलेले पैसे कुठे जातात? यावरचा हा स्पेशल रिपोर्ट.

हिंदूंनी मल्हार सर्टिफिकेट असलेल्या दुकानातूनच मटण खरेदी करा, असं आवाहन नितेश राणेंनी केलं आणि पुन्हा एकदा हलाल विरुद्ध झटका हा वाद नव्याने पेटण्याची शक्यता निर्माण झालीय. हलाल सर्टिफेकेशन काही मोजक्या खासगी संस्थांकडूनच दिलं जातं. या संस्थांचा पैसा इस्लामी वर्चस्व निर्माण करण्यासाठी, जिहादसाठी आणि अतिरेकी कारवायांसाठी वापरला जात असल्याचा खळबळजनक आरोप हिंदूत्ववादी संघटनांनी केलाय.

Jihadi Connection of Halal Certificate
Mumbai Local : हलता येई ना, उतरता येईना; ऐन पुलावर ट्रेन बंद पडल्यानं प्रवाशांची गैरसोय, नेरुळ-उरण लोकल सेवा ठप्प

हलाल आणि झटका या कुठल्या मांसाचे प्रकार नाहीत तर मांस कापण्याच्या पद्धती आहेत. हलाल या अरबी शब्दाचा अर्थ वैध म्हणजेच जे इस्लामला मान्य आहे ते, इस्लाम धर्मात हलाल सर्टिफाईड नसलेल्या वस्तू विकत घेणं हराम मानलं जातं. मात्र हलाल सर्टिफिकेटला भारतीय अन्न सुरक्षा नियामक प्राधिकरणाची मान्यता नाही. त्यामुळे काही खासगी संस्थांच्या माध्यमातून केवळ खाद्यपदार्थच नव्हे तर, सौंदर्यप्रसाधनं, वैद्यकीय साहित्यांसाठीही हलाल सर्टिफिकेट दिलं जातं. मात्र, त्यासाठी किती पैसे अकारले जातात? पाहूयात...

हलाल सर्टिफिकेटची किंमत किती?

हलाल सर्टिफिकेटसाठी वर्षाला 25 हजार 500 रुपये शुल्क

3 वर्षासाठी 61 हजार 500 रुपये शुल्क आकारलं जातं

हलाल लोगो प्रिंट करण्यासाठी 20 हजार रुपये शुल्क

सर्टिफिकेट नतुनीकरणाला 3 वर्षांसाठी 50 हजार रुपये शुल्काची अकारणी

Jihadi Connection of Halal Certificate
Pune Crime : अनैतिक संबंधात अडसर; प्रियकराच्या मदतीने पतीची हत्या, मृतदेह पोत्यात घालून दुचाकीने नेलं अन्..

आंतरराष्ट्रीय पातळीवर हलाल सर्टिफाईड उत्पादनांची उलाढाल तब्बल 5 ट्रिलियन अमेरिकी डॉलर इतकी आहे. त्यामुळे अनेक कंपन्या हलाल सर्टिफिकेट करुन घेतात. मात्र शीख, राजपूत यांच्यासह अनेक हिंदू धर्मीयांचा हलाल मांसाला विरोध आहे. त्यातच आता हिंदू धर्मीयांसाठी मल्हार सर्फिफाईड मटणाचा पर्याय निर्माण करण्यात आलाय. मात्र हा पर्याय धार्मिक धृवीकरणासाठी आहे की खरंच हलाल सर्टिफिकेटच्या माध्यमातून होणाऱ्या जिहादी मानसिकतेला रोखण्यासाठी? हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

Jihadi Connection of Halal Certificate
Jalgaon News : पोटच्या लेकाचा बर्थडे ठरला अखेरचा, त्याच पोराच्या डोळ्यासमोर बाप रेल्वेखाली; काळीच चिरणारी घटना

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com