Villagers protest outside the ZP school in Paranda after teacher B. M. Moholkar was found drunk during school hours. Saam Tv
Video

Dharashiv News: विद्येच्या जागी मद्याचा खेळ! झेडपी शाळेत शिक्षक तर्राट, संतापजनक प्रकारानं गावकरी संतप्त|VIDEO

Teacher Caught Drunk In ZP School: धाराशिव जिल्ह्यातील परंडा येथील झेडपी शाळेत बी. एम. मोहळकर हे शिक्षक पुन्हा नशेत हजर झाल्याचा प्रकार उघडकीस आला. यामुळे ग्रामस्थांत संताप असून, शिक्षण विभागाकडून कठोर कारवाईची मागणी करण्यात येत आहे.

Omkar Sonawane

धाराशिव जिल्ह्यातील परंडा तालुक्यातील जिल्हा परिषद शाळेत एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. बी. एम. मोहळकर नावाचे शिक्षक शाळेत दारूच्या नशेत हजर झाल्याचा प्रकार उघडकीस आला असून, यामुळे परिसरात संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, संबंधित शिक्षक यापूर्वीही अनेक वेळा नशेत शाळेत आल्याचे निदर्शनास आले होते. त्यांच्यावर याआधीही शाळेतील प्रशासन आणि स्थानिक ग्रामस्थांकडून समज देण्यात आली होती. मात्र, त्यांनी कोणतीही सुधारणा न करता पुन्हा एकदा नशेच्या अवस्थेत वर्गात प्रवेश केला.

या प्रकारामुळे विद्यार्थ्यांवर आणि त्यांच्या शिक्षणावर प्रतिकूल परिणाम होत असल्याचे स्थानिकांचे म्हणणे आहे. त्यामुळे संतप्त ग्रामस्थांनी आता शिक्षण विभागाकडे कठोर कारवाईची मागणी केली असून, अशा शिक्षकांमुळे शाळेचा शैक्षणिक दर्जा घसरत असल्याचेही ते म्हणाले.

ग्रामस्थांनी याप्रकरणी लेखी तक्रार सादर केली असून, या प्रकरणाची तात्काळ चौकशी करून संबंधित शिक्षकावर निलंबनासह कडक कारवाई करण्यात यावी, अशी मागणी जोर धरत आहे. शिक्षण विभाग या प्रकरणी काय भूमिका घेतो याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: लातूरमध्ये काँग्रेसला उतरती कळा, माजी महापौर, माजी नगरसेवकांचा भाजपात प्रवेश

Manikrao Kokate : काहीतरी मोठं होणार? माणिकराव कोकाटे नॉट रिचेबल, अजित पवारांनी दौरे रद्द केले, CM फडणवीसांची घेतली भेट

Pune : भारतात अस्थिरता निर्माण करण्यासाठी अमेरिका, चीन प्रयत्नशील, प्रवीण दीक्षित यांचे मत

Ind Vs Sa: चौथ्या सामन्यात बुमराह करणार कमबॅक? पाहा सिरीज जिंकण्यासाठी कशी असेल भारताची प्लेईंग 11

Madhuri Dixit Photos : "परी हो या हो परियों की रानी..."; गुलाबी ड्रेसमध्ये 'धक धक गर्ल'चं आरस्पानी सौंदर्य

SCROLL FOR NEXT