Worms found in PM Poshan Scheme's Millet Nutrition Bar before distribution at ZP School, Dharashiv Saam Tv
Video

PM Poshan Scheme: प्रधानमंत्री पोषण शक्ती योजनेअंतर्गत देणाऱ्या चॉकलेटमध्ये अळ्या | VIDEO

Student Health at Risk: धाराशिवमधील जिल्हा परिषद शाळेत प्रधानमंत्री पोषण शक्ती योजनेअंतर्गत देण्यात येणाऱ्या चॉकलेटमध्ये अळ्या आढळल्या.

Omkar Sonawane

धाराशिव तालुक्यातील पिंपरी येथील जिल्हा परिषद शाळेत विद्यार्थ्यांना देण्यात येणाऱ्या पौष्टिक चॉकलेटमध्ये (मिलेट न्यूट्रेटिव्ह बार) पुन्हा एकदा अळ्या आढळून आल्या आहेत. प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण योजनेअंतर्गत विद्यार्थ्यांना वितरित करण्यात येणाऱ्या या चॉकलेटमध्ये अळ्या असल्याचे वितरित करण्यापूर्वीच लक्षात आले. या प्रकारामुळे विद्यार्थ्यांच्या आरोग्याशी गंभीर स्वरूपात खेळ केला जात असल्याची चिंता पालक आणि शिक्षक वर्गातून व्यक्त केली जात आहे. यापूर्वीही धाराशिव जिल्ह्यातील कळंब तालुक्यातील पाथर्डी येथील शाळेत अशाच प्रकारची तक्रार पालकांनी केली होती. विद्यार्थ्यांना वितरित करण्यात आलेल्या चॉकलेटमध्ये अळ्या आणि किडे आढळल्याची माहिती दिली होती.

सदर चॉकलेट म्हणजेच ‘मिलेट न्यूट्रेटिव्ह बार’ हे ज्वारी, बाजरीपासून तयार केले जात असून महाराष्ट्र शासनाच्या माध्यमातून जिल्हा परिषद शाळांना याचा पुरवठा केला जातो. मात्र या पुरवठ्याची गुणवत्ता तपासली जात नाही की काय, असा प्रश्न उपस्थित होत आहे.

या प्रकाराची गंभीर दखल घेत दोषींवर कठोर कारवाई व्हावी, अशी मागणी पालक, ग्रामस्थ आणि शिक्षकांनी केली आहे. दरम्यान, शिक्षण विभाग आणि प्रशासनाकडून यासंदर्भात काय भूमिका घेतली जाते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

शाळा सुटल्यानंतर दहावीच्या विद्यार्थिनीचा पाठलाग; एकट्यात गाठून अल्पवयीन मुलाने धारदार शस्त्राने संपवलं, नागपुरात खळबळ

Maharashtra Politics: जरांगेंच्या आडून सरकार बदलण्याचा प्रयत्न, 'सरकार उलथवण्यासाठी दादांचे नेते सामील'

Gold Ornaments: कोणत्या लोकांनी सोनं घालू नये? कारण एकदा वाचाच

Manoj Jarange Patil Protest Live Updates : आझाद मैदानात एका तरुणाचा फाशी घेण्याचा प्रयत्न

Manoj Jarange: मनोज जरांगेंना ओबीसीमधूनच आरक्षण का हवय?

SCROLL FOR NEXT