PM Matritva Yojana: केंद्राची खास योजना! गरोदर महिलांना सरकार देतंय ६००० रुपये; प्रधानमंत्री मातृत्व योजनेचा लाभ कसा घ्यायचा?

PM Matritva Vandana Yojana For Pregnant Women: केंद्र सरकारने महिलांसाठी खास पीएम मातृत्व वंदना योजना राबवली आहे. या योजनेत सरकार गर्भवती महिलांना ६००० रुपये देते.
PM Matritva Yojana
PM Matritva YojanaSaam Tv
Published On

केंद्र सरकारने महिलांसाठी अनेक योजना राबवल्या आहे. यामध्ये महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी अनेक योजना आहेत. केंद्र सरकारने गर्भवती महिलांसाठी खास प्रधानमंत्री मातृ वंदना योजना राबवली आहे. या योजनेत गरोदर महिलांना पैसे दिले जातात.

PM Matritva Yojana
LIC Schemes: २०० रुपयांचे होतील २० लाख! जाणून घ्या LIC ची नवी स्कीम

प्रधानमंत्री मातृत्व वंदना योजनेअंतर्गत महिलांना स्वतः ची काळजी घेण्यासाठी आर्थिक मदत केली जाते. जेणेकरुन त्यांना गरोदरपणा कसली गरज भासू नये. या योजनेत गर्भवती महिलांना ६००० रुपये दिले जातात. गरीब कुटुंबातील महिलांना स्वतः ची आणि बाळाची काळजी घेण्यासाठी हे पैसे दिले जातात.

पीएम मातृत्व वंदना योजनेत गरीब कुटुंबातील महिलांना मदत केली जाते.या योजनेत १९ किंवा त्यापेक्षा जास्त वयोगटातील महिलांना लाभ मिळतो. या योजनेसाठी पात्र महिलांनी अंगणवाडी किंवा स्वास्थ केंद्रात जाऊन अर्ज भरायचा आहे. ही योजनेत महिला व बालविकास विभागाद्वारे चावली जाते. या योजनचा लाभ फक्त सरकारी रुग्णालयामध्ये मिळणार आहे.

प्रधानमंत्री मातृत्व वंदना योजनेत ६००० रुपये तीन हप्त्यांमध्ये दिले जातात. या योजनेच पहिला हप्ता १००० रुपये रजिस्ट्रेशन केल्यानंतर १५० दिवसांमध्ये मिळतो. यानंतर गर्भवती होण्याची टेस्ट झाल्यानंतर १८० दिवसांमध्ये २००० रुपये दिले जातात. यानंतर मुलाचा जन्म झाल्यानंतर रजिस्ट्रेशन करावे. यानंतर मुलाला सहा महिन्यांनी लस दिल्यानंतर पैसे दिले जातात.

PM Matritva Yojana
Tax Saving Schemes: टॅक्स वाचवायचाय? या १० सरकारी योजनांना ठरतील फायद्याच्या, कर तर वाचेलच सोबत मिळेल जबरदस्त परतावा

ज्या महिला गरोदर आहेत त्यांना उपचारासाठी मदत मिळावी. आपल्या बाळासाठी आणि आईसाठी पोषण मिळावा, त्यासाठी ही आर्थिक मदत केली जाते. गरोदरपणात बाळ आणि आईचे संगोपन चांगले व्हावे, हा यामागचा उद्देश आहे. त्यामुळे गरीब कुटुंबातील महिलांसाठी योजना राबवण्यात आली आहे. आतापर्यंत अनेक महिलांनी या योजनेचा लाभ घेतला आहे.

PM Matritva Yojana
SBI SIP Scheme: फक्त १०,००० रुपयांची SIP बनवू शकते तुम्हाला करोडपती; 'या' म्युच्युअल फंडमध्ये गुंतवणूक करा अन् मालामाल व्हा

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com