grapes  Saam Tv
Video

Unseasonal Rain: द्राक्षाच्या पंढरीला अवकाळी पावसाचा तडाखा! शेतकरी चिंतेत, VIDEO

Nashik News: नाशिक शहरात विशेषतः ग्रामीण भागात अवकाळी पावसाने दमदार हजेरी लावली. ढगांच्या गडगडाटासह दुपारी साडेतीन वाजल्यानंतर पावसाने तुफान बॅटिंग केली. यामुळे शेत पिकांचे मोठे नुकसान झाले आहे.

Omkar Sonawane

अभिजीत सोनवणे, साम टीव्ही

हवामान खात्याने अंदाज वर्तविल्यानुसार नाशिक जिल्ह्यात अनेक ठिकाणी पावसाच्या सरी कोसळल्या तर काही भागात विजांच्या कडकडाटासह झालेल्या जोरदार पावसाने शेतपिकांचे मोठे नुकसान झाले आहे. नाशिक जिल्ह्यातील काही भागात गारपीट झाल्यामुळे द्राक्षाचे नुकसान झाले आहे. द्राक्षाचीपंढरी म्हणून नाशिकची ओळख आहे,नाशिक येथील द्राक्ष हे देशातच नव्हे तर बाहेर देशात देखील निर्यात केली जातात.

मात्र अवकाळी गारपीटाने द्राक्षाना चांगलेच झोडपून काढले असून यामध्ये मोठ्या प्रमाणात बागायतदारांचे आर्थिक नुकसान झाले आहे. काल संध्याकाळच्या सुमारास हा पाऊस सुरू झाला परिणामी द्राक्षाचे गढ हे खाली कोसळले तर काही द्राक्षाच्या गढांना कीड लागण्यास सुरुवात झाली आहे. बागायतदाराचे दहा ते बारा लाखांचे नुकसान झाले असून व्यापाऱ्यांनी हे द्राक्ष खरेदी करण्यास नकार दिला आहे. त्यामुळे शेतकरी वर्ग हा चिंतेत सापडला असून सरकारकडून मदतीची अपेक्षा करत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Manoj Jarange: कोण उठलं मनोज जरांगेंच्या जीवावर? जरांगेंच्या हत्येसाठी अडीच कोटींची सुपारी?

Kendra Trikon Rajyog: मंगळ ग्रहाने तयार केला केंद्र त्रिकोण राजयोग; 'या' ३ राशींसाठी श्रीमंतीचा मार्ग होणार खुला

शिळी पोळी पोटात गेल्यानंतर शरीरात पाहा काय बदल होतात?

कर्मचाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! 20 वर्षानंतरच घेता येणार VRS; सरकारकडून नवी गाइडलाइन जारी

Parth Pawar Pune Land Scam Case: पुण्यातील 1800 कोटींची जमीन 300 कोटीत, पार्थ पवारांवर जमीन घोटाळ्याचा आरोप

SCROLL FOR NEXT