Uddhav Thackeray addressing the Indian Workers’ Army leaders during a key meeting in Mumbai. Saam Tv
Video

Maharashtra Politics: भाजपचे मनसुबे हाणून पाडा, उद्धव ठाकरेंच्या कामगारसेनेच्या पदाधिकाऱ्यांना सूचना|VIDEO

Uddhav Thackeray Addresses Indian Workers: उद्धव ठाकरे यांनी कामगार सेनेच्या पदाधिकाऱ्यांना भाजपच्या मनसुबे हाणून पाडण्यासाठी एकजुटीने काम करण्याचे कडक आदेश दिले.

Omkar Sonawane

भाजपसोबत कामगार युनियनवरून सध्या जो राडा सुरू आहे, त्या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरेंनी कामगार सेनेच्या पदाधिकाऱ्यांसोबत एक महत्त्वाची बैठक घेतली आहे. या बैठकीमध्ये त्यांनी पदाधिकाऱ्यांना संबोधित करताना भाजपचे मनसुबे हाणून पाडा, अशा कडक सूचना दिल्या आहेत. तसंच, भारतीय कामगार सेना म्हणून सर्वांनी एकसंघ राहण्याचं आवाहन त्यांनी केलं आहे.

भारतीय कामगार सेना ही कुणाचीही वैयक्तिक मक्तेदारी नाही, असं त्यांनी या बैठकीत स्पष्ट केलं आहे. कामगार सेनेच्या पदाधिकाऱ्यांनी एकजुटीने काम करावं आणि भाजपच्या आव्हानाला सामोरं जावं, असा संदेश या बैठकीतून देण्यात आला आहे. या घडामोडींमुळे कामगार क्षेत्रातील राजकारण तापण्याची शक्यता आहे. दोन दिवसापूर्वीच वरळीमध्ये भाजप आणि ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांमध्ये जोरदार राडा झाला होता. याचीच दखल घेत उद्धव ठाकरे यांनी आज कामगारसेनेच्या पदाधिकाऱ्यांच्या बैठकीचे आयोजन केले होते.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Zodiac predictions: आज कोणाचा दिवस उजळणार? जाणून घ्या १० जानेवारीचं पंचांग आणि राशीविशेष

Maharashtra Live News Update : बाळासाहेब आणि उद्धव ठाकरेंशी गद्दारी म्हणजे आपल्या आईच्या दुधाशी बेईमानी : आमदार नितीन देशमुख

तुमच्या ऑनलाईन शॉपिंगवर ITची नजर? व्हायरल व्हिडिओमागचं सत्य काय?

मराठी-हिंदी संघर्ष, मुस्लीम ठरणार किंगमेकर? मुंबईची निवडणूक पुन्हा भाषा आणि प्रांतावर

Maharashtra Politics: एकनाथ शिंदेंनी लातूरमध्ये टाकला मोठा डाव, 17 अपक्ष उमेदवारांचा शिवसेनेत प्रवेश

SCROLL FOR NEXT