पुण्यात सचिन दोडके यांच्या कथित भाजप प्रवेशावरून दोन "अण्णां" मध्ये खडाजंगी?

Clash in Pune BJP Over Sachin Dodke’s Rumoured Entry: पुण्यातील राजकारण तापलं. सचिन दोडके यांच्या भाजप प्रवेशाच्या चर्चेमुळे पुण्यात दोन भाजप नेत्यांमध्ये वाद.
Clash in Pune BJP Over Sachin Dodke’s Rumoured Entry
Clash in Pune BJP Over Sachin Dodke’s Rumoured EntrySaam
Published On

अक्षय बडवे, साम टिव्ही

गेल्या काही दिवसांपासून दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? असा प्रश्न राजकीय फडात रंगतोय. स्थानिक स्वराज्य संस्थांची गणितं वेगळी असतात त्यामुळे दोन्ही पक्ष एकत्र येतील असा छुपा सूर दोन्ही पक्षातील नेत्यांकडून ऐकायला मिळतोय. दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येतील का नाही हा निर्णय येण्यापूर्वीच आता शरद पवारांच्या राष्ट्रवादी मधील सचिन दोडके भाजप मध्ये जाण्यासाठी आग्रही आहेत की काय असा प्रश्न उपस्थित झाला आहे. याचं कारण म्हणजे दोडके यांचे भाजप मध्ये प्रवेश बाबत चे प्रमुख रस्त्यावर लागलेले फ्लेक्स. "मी येतोय जनतेच्या आग्रहासाठी खडकवासल्याच्या जनतेच्या सेवेसाठी" अशा मजकुराचे ज्यावर सचिन दोडके यांचे फ्लेक्स पुण्यातील वारजे भागात पाहायला मिळाले.

"हे फ्लेक्स कोणी लावले ते मला माहिती नाही. भाजप प्रवेशाबद्दल केलेल्या चर्चा "निरर्थक" आहेत, मी कालच आमच्या नेत्या सुप्रिया सुळे यांची मुंबईत जाऊन भेट घेतली आहे" अशी सौम्य प्रतिक्रिया सचिन दोडके यांनी "साम" ला दिली.

दुसऱ्या बाजूला मात्र सचिन दोडके यांच्या या फ्लेक्समुळे आणि भाजप मध्ये होणाऱ्या तथाकथित प्रवेशामुळे आज भाजप च्या बैठकीत मात्र खडाजंगी पाहायला मिळाली. आज पुणे शहरात आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कोर कमिटीची बैठक पार पडली. या बैठकीला खासदार मुरलीधर मोहोळ, मंत्री चंद्रकांत पाटील, भाजप चे शहर अध्यक्ष धीरज घाटे, आमदार सिद्धार्थ शिरोळे, आमदार सुनील कांबळे, आमदार भीमराव तापकीर यासह इतर मुख्य पदाधिकारी उपस्थित होते.

या बैठकीदरम्यान, पुण्याचे खासदार मुरलीधर मोहोळ आणि खडकवासला चे आमदार भीमराव तापकीर यांच्यात सचिन दोडके यांच्या संभाव्य प्रवेशावरून खडाजंगी पाहायला मिळाली. एका बाजूला, मोहोळ यांच्या माध्यमातून सचिन दोडके भाजप मध्ये प्रवेश करू पाहतायत अशी चर्चा आहे तर दुसऱ्या बाजूला, भीमराव तापकीर यांनी मात्र या संभाव्य प्रवेशाला स्पष्टपणे नकार दिला आहे. त्यामुळे भाजपच्या या दोन्ही नेत्यांमध्ये झालेल्या वादामुळे सचिन दोडके यांच्या प्रवेशामुळे अंतर्गत कलह आहे का असा प्रश्न निर्माण झाला आहे.

पत्रकार परिषदेत या बाबत मुरलीधर मोहोळ यांना प्रश्न विचारला असता त्यांनी "अशी कुठली ही "खडाजंगी" आमच्यात झालेली नाही" अशी प्रतिक्रिया दिली आहे.

Clash in Pune BJP Over Sachin Dodke’s Rumoured Entry
३ हजारांत तरूणीचा सौदा; द ताज पेइंग गेस्ट हाऊसमध्ये सेxxx रॅकेटचा अड्डा, 'असा' उघडा पडला आरोपींचा डाव

सचिन दोडके नेमके आहेत तरी कोण?

सचिन दोडके हे पुणे शहरातील वारजे भागातील नगरसेवक आहेत. महापालिकेचा चांगला अनुभव त्यांच्याकडे असून वारजे परिसरात सुद्धा त्यांचं चांगलं वलय आहे. दोन राष्ट्रवादी वेगळ्या झाल्यानंतर दोडके यांनी शरद पवारांची साथ देणे पसंत केलं राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेते सुप्रिया सुळे यांचे खंदे समर्थक म्हणून दोडके यांची ओळख आहे.

खडकवासला मतदारसंघात 2009 पूर्वी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे त्यापाठोपाठ शिवसेनेची सत्ता होती पण गेल्या ४ टर्म पासून याठिकाणी भाजप ने याठिकाणी त्यांचा झेंडा रोवला आहे. दुसऱ्या बाजूला, सचिन दोडके यांना शरद पवारांच्या राष्ट्रवादी ने दोन वेळा आमदारकीचे तिकीट दिलं होतं. सचिन दोडके यांची २०१९ ला २५९५ मतांनी आमदारकी गेली २०२४ मध्ये खडकवासला मतदारसंघात सचिन दोडके (राष्ट्रवादी - शरद पवार), भीमराव तापकीर (भाजप), मयुरेश वांजळे (मनसे) अशी तिरंगी लढत झाली यामध्ये सुद्धा भीमराव तापकीर यांनी निवडणूक जिंकत सलग चौथ्यांदा आमदार पद मिळवलं आणि पुन्हा एकदा दोडके यांना पराभवाला सामोरे जावं लागलं.

Clash in Pune BJP Over Sachin Dodke’s Rumoured Entry
प्रवाशांसाठी खूशखबर! टोल भरण्याची आता गरजच नाही, टोल प्लाझापासून किती दूर राहिल्यास मिळते सूट?

दोडके यांना भाजपमध्ये "एन्ट्री" देण्यास विरोध?

काही आठवड्यांपूर्वी खडकवासला मतदारसंघ निहाय भाजप ची एक बैठक पार पडली. या बैठकीत भाजपच्या स्थानिक कार्यकर्त्यांनी पक्षात "बाहेरच्यांना" प्रवेश देऊ नका असं स्पष्ट मत मांडलं. जर बाहेरून येणाऱ्यांना प्रवेश दिला तर आम्ही राजीनामा देऊ असा इशारा सुद्धा काही कार्यकर्त्यांनी दिला. जी लोकं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यसह पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना शिव्या देणारे "लोकांना" प्रवेश देऊ नका अशी ठाम भूमिका कार्यकर्त्यांनी मांडली.

आगामी पुणे महानगर पालिकेची निवडणूक डोळ्यासमोर ठेवत भाजप मध्ये जाण्यासाठी अनेक जणं इच्छुक आहेत हे स्पष्टपणे दिसू लागलं आहे. अनेक जणं भाजप मधील नेत्यांच्या भेटी घेत आहेत तर अनेक जणं तिकडे जाण्यासाठी त्यांच्या परीने "फिल्डिंग सेट" करताना दिसतायत पण असं असलं तरी सुद्धा बाहेरून भाजप मध्ये येणाऱ्यांना प्रस्थापितांचा चांगला विरोध होताना दिसतोय. याचेच एक मूर्तिमंत उदाहरण म्हणजे आज "दोन अण्णांमध्ये" झालेली शाब्दिक चकमक..

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com