NANDED NEWS  Saam Tv
Video

Crime News: चोरीचा संशय आला म्हणून खाऊ घातला मंतरलेला नागवेलीच्या पानाचा विडा, व्हिडिओने नांदेडमध्ये खळबळ

Theft Suspicion Punishment: नांदेडमधील केरूर गावात चोरीच्या संशयावरून दोन लोकांना नागलीच्या पानाचा विडा तांदुळात बुडवून खाऊ घातल्याची घटना घडली आहे.

Omkar Sonawane

नांदेडच्या केरूर गावात चोरीच्या संशयावरून दोन व्यक्तींना नागलीच्या पानाचा विडा खाऊ घालण्यात आला.

या विड्याला थंड पाण्यात बुडवून तांदूळ टाकले होते आणि संशयितांना ते खायला लावण्यात आले.

विडा खाल्ल्यानंतर संशयितांना शारीरिक वेदना झाल्या, ज्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला.

पोलीसांनी फिर्यादीच्या आधारे मांत्रिक आणि इतरांवर गुन्हा नोंदवला आहे.

चोरीच्या संशयावरून दोघांना मंतरलेल्या नागलीच्या पानाचा विडा थंड पाण्यात बुडवून त्यात तांदूळ टाकून खाऊ घालण्यात आल्याची धक्कादायक घटना नांदेडच्या बिलोली तालुक्यातील केरूर गावात घडली आहे. या अघोरी प्रकाराचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. केरूर गावातील रामा आरोटे यांच्या निवासस्थानी 19 जुलै रोजी चोरीची घटना घडली होती. गावातील परमेश्वर राठोड यांच्यावर संशय होता.

या घटनेची पोलीस ठाण्यात तक्रार दाखल न करता रामा आरोटे हे धर्माबाद तालुक्यातील जारीकोट येथील गंगाराम कादरी या मांत्रिकाकडे गेले. मांत्रीकाने तांदूळ टाकलेले नागलीच्या पानाचे विडे देत ज्याच्यावर संशय आहे त्यांना थंडगार पाण्यात बुडवून हे विडे खाण्यास द्याला सांगितले. मांत्रिकांनी सांगितल्याप्रमाणे रामा आरोटे यांनी 11 ऑगस्ट रोजी पानाचे विडे परमेश्वर राठोड आणि अन्य एकाला खाण्यास दिले. यावेळी विडा खाल्याने परमेश्वर राठोड यांच्या शरीराला वेदना झाल्या.

विडा खाऊ घातल्याचा व्हिडिओ एकाने आपल्या मोबाईल मध्ये कैद केला. परमेश्वर राठोड यांनी दिलेल्या फिर्यादीवरून पोलीसांनी मांत्रीक गंगाराम कादरी, रामा आरोटे, गंगाधर आरोटे, राजू आरोटे या चौघा जणाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Bigg Boss 19 : बिग बॉसच्या घरात होणार पहिली वाइल्ड कार्ड एन्ट्री? स्पर्धकाचे नाव वाचून बसेल धक्का

Anant Chaturdashi 2025 live updates : लालबागच्या राजाची विसर्जन मिरवणूक सुरु

Pratapgad Fort History: ऐतिहासिक शौर्य, भव्य वास्तुकला असलेले प्रतापगड; जाणून घ्या इतिहास आणि वैशिष्ट्ये

Maharashtra Live News Update: मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या हस्ते नव्या बसांना हिरवा झेंडा

माजी पंतप्रधानांच्या बहिणीवर महिलांचा हल्ला, भर पत्रकार परिषदेत अंडी फेकली, नेमकं कारण काय?

SCROLL FOR NEXT