Chandrapur Tadoba Saam TV
Video

Chandrapur News : ताडोबा पर्यटन आजपासून ३ महिने बंद | VIDEO

Tadoba Core Zone Closed for Monsoon Tourism : चंद्रपूर जिल्ह्यातील ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पाचे कोअर क्षेत्र आजपासून बंद राहणार आहे. पावसाळ्यात जंगलातील रस्ते वाहनांसाठी गैरसोयीचे होतात त्यामुळे हा निर्णय दरवर्षी घेतला जातो. 1 जुलै ते 30 सप्टेंबरदरम्यान ही बंदी असणार आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

चंद्रपूर जिल्ह्यातील प्रसिद्ध ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पाचे कोअर क्षेत्र आजपासून म्हणजेच 1 जुलैपासून 30 सप्टेंबर पर्यंत पर्यटनासाठी बंद ठेवण्यात येणार आहे. दरवर्षीप्रमाणे पावसाळ्यात हा निर्णय घेण्यात येतो. यामागच कारण जंगलातील रस्त्यांची खराब अवस्था आणि वन्यजीवांच्या संवर्धनासाठी आवश्यक असलेली शांतता हे आहे. पावसाळ्यात रस्ते निसरडे व दाट होतात, त्यामुळे पर्यटक आणि वाहनांसाठी ते धोकादायक ठरू शकतात. तसेच वन्यजीवांचा प्रजनन काळ असल्याने त्यांना कोणताही त्रास न होता सुरक्षित वातावरण मिळावे, हाही उद्देश या बंदीमागे आहे. ही बंदी केवळ कोअर झोनमध्ये लागू राहील, तर बफर झोनमधील सफारी आणि इतर पर्यटन सुविधा पूर्ववत सुरू राहणार आहेत. वन विभागाने पर्यटकांना सहकार्य करण्याचं आवाहन केलं आहे आणि पावसाळ्यानंतर पुन्हा कोअर क्षेत्रात प्रवेश खुला होईल, अशी माहिती अधिकाऱ्यांनी दिली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Railway News : रेल्वे प्रवाशांसाठी खुशखबर, मध्य-पश्चिम रेल्वेवर धावणार २३८ नव्या एसी लोकल

Shanaya Kapoor: स्टायलिश लूकसाठी कपूर खानदानच्या लाडक्या लेकीला करा फॉलो

Maharashtra Live Update: वाशिमच्या रिसोड तालुक्यात दोन तास मुसळधार पाऊस

Hair Spa: हेअर स्पा करताय? तर थांबा, आधी 'हे' होणारे गंभीर परिणाम वाचाच

Cricketer Death : प्रसिद्ध भारतीय क्रिकेटपटूचे निधन, पुण्यात घेतला शेवटचा श्वास; क्रिकेटजगतात हळहळ

SCROLL FOR NEXT