Uttarakhand : उत्तराखंडमध्ये ढगफुटीसदृश पाऊस; मुंबईसह महाराष्ट्रातील 200 पर्यटक अडकले | VIDEO

Uttarakhand Floods : हिमाचल, उत्तराखंड या राज्यांमधील अनेक भागांमध्ये ढगफुटी सदृश्य पाऊस झाला आहे.उत्तराखंडमध्ये फिरायला गेलेले महाराष्ट्रातील 200 पर्यटक अडकल्याची माहिती मिळाली आहे. या पर्यटकांमध्ये 50 जण मुंबईतील असल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे.

उत्तराखंडमध्ये झालेल्या मुसळधार आणि ढगफुटी सदृश पावसामुळे गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे. मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, महाराष्ट्रातील सुमारे २०० पर्यटक या नैसर्गीक आपत्तीमध्ये अडकले असून, यामधिल ५० जण मुंबईतील असल्याचे समजते. उत्तराखंड आणि हिमाचल प्रदेशातील अनेक भागांमध्ये पावसाने अक्षरशः थैमान घातले आहे. रस्ते कोसळले, अनेक वाहने पुराच्या प्रवाहात वाहून गेली आहेत. काही भागांमध्ये घरांमध्ये पाणी शिरल्यामुळे जनजीवन विस्कळीत झालं आहे, तर काही ठिकाणी घरं अक्षरशः पत्त्याच्या बंगल्यासारखी कोसळून जमीनदोस्त झाली आहेत. या मुसळधार पावसामुळे महापूर सदृश स्थिती निर्माण झाली असून, बचाव आणि मदतकार्य युद्धपातळीवर सुरू आहे. स्थानिक प्रशासन व आपत्कालीन यंत्रणा सतर्क असून, अडकलेल्या पर्यटकांचा शोध घेण्याचं काम सुरू आहे. नागरिकांनी सुरक्षित स्थळी थांबण्याचं व अधिकृत सूचनांचं पालन करण्याचं आवाहन करण्यात आलं आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com