Video

Nandgaon Vidhansabha: नांदगाव विधानसभा मतदारसंघात मोठा राडा, सुहास कांदे यांची समीर भुजबळांना मारून टाकण्याची धमकी

Suhas Kande vs Sameer Bhujbal: आज सकाळी ७ वाजल्यापासून सर्वत्र मतदानाला सुरुवात झाली आहे. अशातच नांदगाव विधानसभा मतदारसंघात मोठा राडा झाल्याची माहिती मिळत आहे.

Dhanshri Shintre

महाराष्ट्र विधानसभेच्या (Maharashtra Vidhan Sabha Election 2024) २८८ जागांसाठी आज मचदान पार पडत आहे. आज सकाळी ७ वाजल्यापासून सर्वत्र मतदानाला सुरुवात झाली आहे. अशातच नांदगाव विधानसभा मतदारसंघात मोठा राडा झाल्याची माहिती मिळत आहे. अपक्ष उमेदवार समीर भुजबळ आणि शिवसेना शिंदे गटाचे उमेदवार सुहास कांदे यांच्या गटात जोरदार बाचाबाची झाली. दोन्ही नेते आमने सामने आल्याने मोठा गोंधळ उडाला आहे. यावेळी कार्यकर्त्यांमध्ये धक्काबुक्कीही झाली. याचे व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. विधानसभा निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर होताच नांदगाव विधानसभा मतदारसंघाची राज्यभरात चर्चा झाली. कारण राष्ट्रवादी अजित पवार गटाचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांचे पुतणे समीर भुजबळ यांनी या मतदारसंघात अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला आहे.

सुहास कांदे यांनी त्यांच्या कॉलेजवर ऊसतोड मजुरांना पकडून ठेवले होते. या मजुरांना कांदे यांच्याकडून पैशांचे वाटपही होत असल्याचे माहिती मिळाल्यानंतर समीर भुजबळ आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी तिथे रेड टाकली.तुझा मर्डर फिक्स आहे आज असं सुहास कांदे यांनी समीर भुजबळांना मारून टाकण्याची धमकी दिली. सुहास कांदे यांनी बोलाविलेल्या मतदारांना समीर भुजबळांनी अडवले. यावेळी समीर भुजबळ आणि सुहास कांदे यांच्या गटात जोरदार राडा झाल्याचे दिसून आले. यामुळे नांदगावमध्ये वातावरण तापले आहे. आता पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून पोलीस दोन्ही गटांना शांत राहण्याचे आवाहन करत आहेत.

नांदगाव राडा प्रकरणी अडविलेल्या मतदारांना चौकशी करून मतदान केंद्रावर पाठवले. निवडणूक आयोगाच्या पथकाने देखील चौकशी केली. चौकशीत मतदार हे स्थानिक ढेकू गावचे असल्याचे सिध्द झाले आहे. निवडणूक निरीक्षक यांनी घटनास्थळावर भेट दिली. घडलेल्या प्रकाराची चौकशी करून कारवाई करू, निवडणूक निरीक्षक बलदेव पुरुषार्थ यांनी प्रतिक्रिया दिली. तर आम्हाला वेठीस धरले जात असल्याचा मतदारांचा आरोप आहे. अडविलेल्या मतदारामध्ये एक गरोदर महिला असल्याची माहिती समोर आली आहे. मतदार रवाना झाल्याने घटनास्थळावर शांतता पसरली आहे. पोलीस मात्र तळ ठोकून बसले आहेत.

Denver Airport Incident : १७३ प्रवाशांना घेऊन येणाऱ्या विमानाच्या लँडिंग गियरला आग, अमेरिकेत मोठी दुर्घटना टळली | Video

Kharadi Rave Party : मोठी बातमी! पुण्यातील रेव्ह पार्टी प्रकरणात रोहिणी खडसेंच्या नवऱ्याला अटक

Maharashtra Live News Update: यवतमाळमध्ये आमदार सोनवणे विरोधात आदिवासी संघटना आक्रमक

स्प्रे मारून बेशुद्ध, शेतात नेत अत्याचार अन् बांधून टाकलं; बीडमध्ये अल्पवयीन मुलीसोबत भयंकर कृत्य | Beed News

Sabudana Laddu Recipe: श्रावणात उपवासाला झटपट बनवा 'साबुदाणा लाडू', ही रेसिपी एकदा वाचाच

SCROLL FOR NEXT