ladki bahin yojana  saam tv
Video

Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणी झाल्या दोडक्या, सोलापुरातील १२ हजार महिलांना १५०० रुपयांचा लाभ बंद, VIDEO

Solapur News: लाडकी बहीण योजना बंद होणार असल्याचे अनेकवेळा सत्ताधारी नेत्यांनी अप्रत्यक्षपणे आपल्या भाषणातून बोलून दाखवले. यानंतर आता एकेक करून महिलांचे नाव कमी होताना दिसत आहे.

Omkar Sonawane

विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर आपल्या प्रचाराच हत्यार बनवण्यासाठी महायुती सरकारने लाडकी बहीण योजना आणली. या योजनेला महिलांनी भरभरून प्रतिसाद देत पुन्हा एकदा महयुतीचे सरकार महाराष्ट्रात बहुमताने अस्तित्वात आले. मात्र आता सरकारकडून लाडक्या बहीणींच्या पात्रता तपासणीला सुरुवात झाली आहे. यामध्ये सोलापूर जिल्ह्यातील 12 हजार चारचाकी स्वतःच्या नावावर असलेल्या महिला आहेत. तर संजय गांधी निराधार योजनेचा लाभ घेणाऱ्या सुमारे 28 हजार महिला आहेत.

आगामी काळात अडीच लाखांहून अधिक महिला अपात्र ठरल्या आहे. यामुळे महिलावर्गांमध्ये मोठ्या प्रमाणात नाराजीचा सुर उमटला आहे. महायुती सरकारने आपल्या जाहीरनाम्यात महिलांना 2100 रुपये हप्ता देणार असल्याचे सांगितले होते.मात्र निवडणूक झाल्यावर आता सरकारला या आश्वासनाचे विसर पडल्याचे दिसत आहे. तसेच दिलेल्या आश्वासनाची पूर्तता तर केलीच नाही मात्र आहे त्या योजनेतून महिलांचे नाव विविधकारणे देऊन वगळण्यात येत आहे. यामुळे विरोधकांनी सरकारवर पुन्हा एकदा निशाणा साधला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Bus Accident : भीषण अपघात; प्रवाशांनी भरलेली बस १५ फूट खोल नदीत कोसळली, दोन जणांचा मृत्यू, २५ जण जखमी

Stamp Duty Government Decision: फडणवीस सरकारचा मोठा निर्णय, सर्वप्रकारच्या प्रतिज्ञापत्रासाठी लागणारे ₹500 चे मुद्रांक शुल्क माफ

Manoj Jarange: विठ्ठला... सरकारला सद्बुद्धी दे, मराठा आरक्षण लवकर मिळू दे, जरांगे पाटलांचे साकडे|VIDEO

Maharashtra Live News Update: शिर्डी माझे पंढरपूर! आषाढी निमित्ताने शिर्डीत साई भक्तांची मांदियाळी

Vastu For Money: धनवाढीसाठी घरात ठेवा 'या' ७ चमत्कारी वस्तू

SCROLL FOR NEXT