CCTV grab shows Shinde Sena district leader Devdas Darekar involved in a scuffle with a priest inside the sanctum of Bhimashankar Jyotirlinga temple. Saam Tv
Video

एकनाथ शिंदेंच्या नेत्याचा भीमाशंकर मंदिरात राडा, पुजाऱ्याला लाथाबुक्क्यांनी मारहाण|VIDEO

Devidas Darekar Shinde Group Temple Violence Video: भीमाशंकर ज्योतिर्लिंग मंदिरात शिंदे गटाच्या नेत्याकडून पुजाऱ्याला मारहाण करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे.

Omkar Sonawane

बारा ज्योतिर्लिंगापैकी एक असलेल्या भिमाशंकर येथे शंकराच्या मंदिरात जबर मारहाणीचा प्रकार घडला आहे. शिंदेसेनेच्या पुणे जिल्हाध्यक्षाने थेट पूजऱ्याला मारहाण केल्याने मंदिर प्रशासनाने संताप व्यक्त केला आहे. शिंदे गटाचे पुणे उत्तर जिल्हाप्रमुख देवदास दरेकर यांनी पुजाऱ्याला मारहाण केली. योगेश शिर्के असे या पुजाऱ्याचे नाव असून अद्यापतरी कुठलीही पोलीस तक्रार दाखल झाली नाहीये. ही संपूर्ण घटना मंदिरातील सीसीटीव्हीमध्ये कैद झाली आहे.

नेमके काय घडले?

शिंदेगटाचे जिल्हा प्रमुख देविदास दरेकर यांनी पुजऱ्याला मारहाण केली त्यावेळी भीमाशंकर मंदिराच्या मुख्य गाभाऱ्यात भक्तांचा सुरू असलेला अभिषेक सुरू असताच दरेकर आणि त्यांचे सहकारी दर्शनासाठी मंदिरात दाखल झाले. अभिषेक करणाऱ्या भक्तांच्या मागे उभे राहिले. मंदिर गाभाऱ्यात गर्दी होत असल्याने त्यावेळी मंदिरात पुजारी असणाऱ्या योगेश शिर्के यांनी दरेकर यांना दर्शन घेऊन बाहेर जाण्याची विनंती केली त्यावेळी दरेकर यांनी देखील शिवलिंगाची पूजा करण्याची इच्छा व्यक्त केली. यावरूनच दरेकर आणि पुजारी योगेश शिर्के या दोघांमध्ये बाचाबाची झाली. या शाब्दिक वादावादीचे रूपांतर हे मारामारीमध्ये झाले. यावेळी इतर पुजाऱ्यांनी मध्यस्थी करत हा वाद मिटवला. या संपूर्ण प्रकारचा व्हिडिओ सीसीटीव्हीमध्ये कैद झाला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

कंठ दाटला, शब्दही फुटत नव्हते....अजित पवारांच्या निधनानंतर शरद पवार भावुक|VIDEO

Ajit Pawar Death News LIVE Updates : अजित पवारांचं पार्थिव विद्या प्रतिष्ठानच्या प्रांगणाकडे नेण्यात आलं

Ajit Pawar Death: राज्यपाल आणि मुख्यमंत्री यांच्याकडून उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या कुटुंबीयांचे सांत्वन

Maharashtra Live News Update: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे मुंबईकडे रवाना

Ajit Pawar Death: अजितदादांनी गावकऱ्यांचे जीवन सुधारण्यासाठी काम केलं; पंतप्रधान मोदींनी व्यक्त केला शोक

SCROLL FOR NEXT