Raj Thackeray’s surprise visit to Uddhav Thackeray’s residence ‘Matoshree’ in Mumbai sparked fresh political speculation. Saam Tv
Video

मातोश्रीवर राज आणि उद्धव ठाकरेंची अर्धा तास खलबतं; भेटीत नेमकी काय झाली चर्चा? VIDEO

Thackeray Brothers Reunite Again: राज ठाकरे अनपेक्षितपणे मातोश्रीवर दाखल झाल्यानंतर अर्धा तास दोघांमध्ये चर्चा रंगली. या भेटीमुळे राज्याच्या राजकारणात नवे समीकरण तयार होणार का, याकडे सगळ्यांचे लक्ष आहे.

Omkar Sonawane

मुंबईत आज पुन्हा एकदा ठाकरे बंधूंची गुप्त भेट झाली आहे. नियोजित नसतानाच मनसे अध्यक्ष राज ठाकरे थेट ‘मातोश्री’वर, म्हणजेच उद्धव ठाकरे यांच्या निवासस्थानी दाखल झाले. विशेष म्हणजे या भेटीबाबत पूर्ण गुप्तता पाळण्यात आली असून, मातोश्रीवर कोणताही अन्य नेता उपस्थित नव्हता.

आज सकाळी संजय राऊत यांच्या कौटुंबिक कार्यक्रमात उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे दोघेही एकत्र दिसले. त्याच कार्यक्रमात ठाकरे गटाचे नेते अनिल देसाई, मिलिंद नार्वेकर, सचिन आहिर उपस्थित होते. मात्र, राज ठाकरे मातोश्रीवर जाणार आहेत याची कुणालाच कल्पना नव्हती. हे प्रथमच झाले असे नाही.

याआधीही दोन्ही भावांनी अनेकदा गुप्तपणे भेट घेतली आहे. उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवशी राज ठाकरे थेट मातोश्रीवर दाखल झाले होते. गणेशोत्सवानंतर उद्धव ठाकरे देखील राज ठाकरेंच्या निवासस्थानी ‘शिवतीर्थावर’ पोहोचले होते. या नव्या भेटीमुळे राजकीय वर्तुळात चर्चेचा भडका उडाला आहे. दोन्ही भावांमध्ये नक्की काय चर्चा झाली, भविष्यातील राजकारणात काही नवीन समीकरण तयार होणार का, या प्रश्नांवर आता सगळ्यांचे लक्ष लागले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

भर मैदानात जोरदार राडा, दोन भारतीय खेळाडू एकमेकांशी भिडले; नेमकं काय घडलं? VIDEO

Nandurbar News: वाहनात पेट्रोल भरत असताना माथेफिरूने पेट्रोल पंपावर आग लावण्याचा धक्कादायक प्रयत्न|VIDEO

Prakash Ambedkar : 'मला मुख्यमंत्री व्हायचं नाही, कारण...; प्रकाश आंबेडकरांनी स्पष्टच सांगितलं

Maharashtra Live News Update: भंडारा शहरातील मिस्कीन टॅंक गार्डनचा तलाव फुटला

Bacchu Kadu : मैत्रीत दुरावा! गुलाबराव पाटलांची भेट न घेताच बच्चू कडू परतले, कारण काय?

SCROLL FOR NEXT